Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! बाबा रामदेव यांच्या पतंजलीला केंद्र सरकारची नोटीस, संशयास्पद व्यवहारांबद्दल मागितलं स्पष्टीकरण

योग गुरु बाबा रामदेव यांच्याशी संबंधित पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनी पुन्हा अडचणीत सापडली आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहाराबात केंद्र सरकारने नोटीस बजावली असून स्पष्टीकरण मागितलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 30, 2025 | 08:10 PM
मोठी बातमी! बाबा रामदेव यांच्या पतंजलीला केंद्र सरकारची नोटीस, संशयास्पद व्यवहारांबद्दल मागितलं स्पष्टीकरण

मोठी बातमी! बाबा रामदेव यांच्या पतंजलीला केंद्र सरकारची नोटीस, संशयास्पद व्यवहारांबद्दल मागितलं स्पष्टीकरण

Follow Us
Close
Follow Us:

योग गुरु बाबा रामदेव यांच्याशी संबंधित पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनी पुन्हा अडचणीत सापडली आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहाराबात केंद्र सरकारने नोटीस बजावली असून स्पष्टीकरण मागितलं आहे. कंपनीला कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आर्थिक गुप्तचर विभागाला कंपनीचे व्यवहार संशयास्पद आढळल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे पतंजली कंपनी आणि बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Bihar Election : बिहार निवडणुकीआधी नितीश कुमारांची मोठी खेळी; उच्चवर्णीयांच्या विकासासाठी आयोगाची स्थापना

प्राथमिक तपास सुरू, व्यवहारांची रक्कम अद्याप स्पष्ट नाही

सध्या तपासाची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असून, या व्यवहारांची अचूक रक्कम किंवा स्वरूप उघड करण्यात आलेले नाही. मंत्रालयाने कंपनीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यासोबतच, पतंजली आयुर्वेदच्या कारभाराची व निधीच्या वापराची सखोल चौकशी होणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, पतंजली आयुर्वेदच्या वतीने देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

यापूर्वीही वादात सापडली होती पतंजली

पतंजली कंपनी वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कंपनीवर करचुकवेगिरी आणि चुकीच्या पद्धतीने टॅक्स परतावा मागण्याचे आरोप लावण्यात आले होते. तसेच, पतंजलीकडून काही गंभीर आजारांवरील उपचाराचे भ्रामक दावे करत जाहिराती केल्याबद्दल न्यायालयाने कडक कारवाई केली होती. सुप्रीम कोर्टाने अशा जाहिरातींवर बंदी घातली होती आणि हे ‘ड्रग्स अ‍ॅन्ड मॅजिक रेमेडीज (आपत्तिजनक जाहिरात) कायदा, १९५४’ च्या उल्लंघनात मोडते, असे स्पष्ट केले होते.

Assam Fake Encounters : आसाममध्ये १७१ बनावट चकमकी, सखोल चौकशी करण्याचे आदेश

शेअर बाजारातही परिणाम

पतंजली आयुर्वेद ही एक खासगी कंपनी असली तरी तिची एक युनिट ‘पतंजली फूड्स लिमिटेड’ ही शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. या युनिटच्या शेअर्समध्ये चालू महिन्यात सुमारे १०% घसरण झाली आहे. मागील वर्षी देखील या युनिटला सरकारकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सरकारकडून मिळालेली ही नोटीस आणि सुरु असलेली चौकशी पतंजलीसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. कंपनीच्या पारदर्शकतेबाबत आणि आर्थिक नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने याचे भविष्यातील व्यावसायिक परिणाम दिसून येऊ शकतात. पुढील काही महिन्यांत या प्रकरणावर काय निष्कर्ष येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Modi government notice to baba ramdev suspicious fund diversion latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • Modi government
  • Patanjali Group

संबंधित बातम्या

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
1

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

Wheat MSP Hike: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ, आता प्रति क्विंटल होणार…
2

Wheat MSP Hike: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ, आता प्रति क्विंटल होणार…

Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस; सरकारची मोठी घोषणा
3

Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस; सरकारची मोठी घोषणा

GST मध्ये करण्यात आली मोठी सुधारणा; आता मिळेल अर्थव्यवस्थेला चालना?
4

GST मध्ये करण्यात आली मोठी सुधारणा; आता मिळेल अर्थव्यवस्थेला चालना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.