Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहम्मद अली जिना यांचे पूर्वज हिंदूच! ही आहे गुजरात ते कराची पर्यंतची गोष्ट

जेनाभाई व्यवसायानिमित्त गोन्दल इथे गेले. आणि त्यानंतर आपली पत्नी मिठीबाई बरोबर आजच्या पाकिस्तानमधील कराचीला स्थायिक झाले. 1876 मध्ये मिठी बाईंनी एका मुलाला जन्म दिला, जो पुढे जाऊन ‘स्वतंत्र पाकिस्तानचा मुख्य चेहरा’ म्हणजेच ‘कायदेआझम मोहम्मद अली जिना’ बनला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 14, 2026 | 08:35 PM
मोहम्मद अली जिना यांचे पूर्वज हिंदूच! ही आहे गुजरात ते कराची पर्यंतची गोष्ट
Follow Us
Follow Us:

सन 1947.. भारताला वसाहतवादी राज्यकर्त्यांपासून म्हणजेच ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य ज्याला मिळवण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचा बलिदान दिलं, कित्येक आंदोलनं करण्यात आली, चळवळी करण्यात आल्या, लढा देण्यात आला. आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या कित्येकांनी आपली संपूर्ण आयुष्य या देशासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी झोकून दिली. तेव्हा जाऊन या अडीचशे वर्षांचा वनवास संपला आणि भारत स्वतंत्र झाला आणि सार्वभौम भारतीय गणराज्य बनला.

पण हे स्वातंत्र्य ही बऱ्याच मोठ्या अडचणी घेऊन आलं, त्यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे भारत पाकिस्तानची फाळणी. ब्रिटिश राज संपुष्टात आलं खरं पण त्यांची कुटनीती म्हणजे फोडा आणि राज्य करा, ही सगळ्या भारतीय उपखंडावर विपरीत परिणाम करून गेली. 1947 ला स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र पाकिस्तान यांची निर्मिती झाली. मुस्लिम लीगच्या संगनमतातून मुस्लिम जनतेसाठी स्वतंत्र राष्ट्र म्हणजेच पाकिस्तानची मागणी करण्यात आली. आणि ती सुदैवानं की दुर्दैवानं पूर्ण ही झाली. या स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा मुख्य चेहरा होता तो म्हणजे ‘मोहम्मद अली जिना’ ज्यांना पाकिस्तानचे संस्थापक ‘कायदेआजम मोहम्मद अली जिना’ असेही म्हटलं जातं. ब्रिटिश भारतापासून वेगळा स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्र निर्माण करणारे मोहम्मद अली जिना होते तरी कोण? त्यांचे पूर्वज कोण होते? त्यांचे कुटुंब, परिवार नेमका कुठून होता? आज इथे जाणून घेऊयात,

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व

मोहम्मद अली जिनांचे आजोबा गुजरात मधील राजकोट इथल्या ‘पानेली मोटी’ या गावात राहायचे. त्यांचं नाव होतं पुंजाभाई ठक्कर. पुंजाभाई ठक्कर म्हणजेच अली जिनांचे आजोबा लोहाना ठक्कर या हिंदू रघुवंशी जातीचे होते. आजही त्यांच जुनं राहतं घर पानेली गावात मोहम्मद अली जिनांच घर म्हणून प्रसिद्ध आहे. पुंजाबाई यांचा परिवार व्यवसाय क्षेत्रातील होता, म्हणून त्यांनी त्याकाळी मच्छीमारीचा-मासे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पुंजाभाईंच्या या मासे विकण्याच्या व्यवसायाला त्यांच्या जातीतील लोकांकडून भरपूर विरोध झाला. पानेली गावातील लोहाना ठक्कर समाज त्यावेळी थोड्या मागासलेल्या विचारांचा असल्यामुळे पुंजाभाईंना त्यांच्या समाजातून जात बाहेर करण्यात आलं. त्यांना जात बाहेर केलं गेल्यामुळे पुंजाभाईनी धर्म परिवर्तन करून इस्लाम स्वीकारला. ‘शिया खोजा’ मुस्लिम समुदायात त्यांनी स्वतःला स्वीकारलं. असं म्हटलं जातं की त्यांना या गोष्टीचा पुन्हा पश्चातापही झाला होता, त्यांना पुन्हा हिंदू बनायचं होतं पण तसं होऊ शकलं नाही. पुंजाभाईना एकूण चार मुलं होती. तीन मुले वलजीभाई, नथूभाई आणि जेनाभाई आणि एक मुलगी जिच नाव होतं मानबाई. पुंजाभाई आपल्या चारही मुलांबरोबर पानेली मोटी गावातच शेवटपर्यंत राहिले.

जगभरातील ते देश जिथे एकही मुस्लिम नाही; वाचा संपूर्ण लिस्ट

पण त्यांचा सगळ्यात लहान मुलगा म्हणजे जेनाभाई व्यवसायानिमित्त शेजारच्या गोन्दल इथे गेले. आणि त्यानंतर आपली पत्नी मिठीबाई बरोबर आजच्या पाकिस्तानमधील कराचीला स्थायिक झाले. 1876 मध्ये मिठी बाईंनी एका मुलाला जन्म दिला, जो पुढे जाऊन ‘स्वतंत्र पाकिस्तानचा मुख्य चेहरा’ म्हणजेच ‘कायदेआझम मोहम्मद अली जिना’ बनला. याप्रमाणे मोहम्मद अली जिना यांचे पूर्वज गुजरातच्या राजकोटमधील मधील एका गावातून असून हिंदू रघुवंशी जातीचे असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Mohammad ali jinas ancestors are hindu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • History
  • pakistan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.