२० हून अधिक देश कोरोनाच्या विळख्यात; सध्याचा विषाणू ५ वर्षांपूर्वी इतका धोकादायक बनलाय का? वाचा सविस्तर
गेल्या काही आठवड्यांपासून भारतासह २० हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. JN.1 आणि BA.2.86 यासारखे काही नवीन वेरिएंट्स वेगाने पसरत आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे यावेळी कोविड गेल्या दोन तीन वर्षांपेक्षा जास्त धोकादायक बनला आहे का? विषाणूमध्ये काही धोकादायक उत्परिवर्तन झालं आहे का? पाहूयात या रिपोर्टमधून…
आतड्यांचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता यांच्यातील परस्परसंबंध, काय सांगतात तज्ज्ञ
दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील मेडिसिन विभागातील डॉ. अजीत कुमार सांगतात की सध्या हवामानात मोठा बदल झालेला आहे. एकीकडे पावसाळी वातावरण, दुसरीकडे उष्णता आणि आर्द्रतेचा वाढलेला स्तर. यामुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या सामान्य व्हायरल आजारांना खतपाणी मिळतं. अशा वातावरणात एक व्हायरस दुसऱ्यावर मात करतो आणि त्यातून कोरोना सारखा संसर्गही झपाट्याने पसरतो.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर किंवा लसीकरणानंतर शरीरात निर्माण झालेली प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) काही महिन्यांनी कमी होऊ शकते. वेळोवेळी होणाऱ्या म्यूटेशनमुळे नवीन वेरिएंट्स समोर येतात आणि पूर्वीची इम्युनिटी त्या वेरिएंट्सविरुद्ध पुरेशी ठरत नाही. त्यामुळेही नवीन रुग्णसंख्या वाढतेय.
JN.1 आणि BA.2.86 दोन्ही वेरिएंट्स आधीच्या तुलनेत अधिक वेगाने पसरण्याची क्षमता बाळगतात. मात्र जागतिक आरोग्य संघटना (WHO) किंवा इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्याकडून अजूनपर्यंत ही वेरिएंट्स अधिक घातक असल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार हे वेरिएंट्स सर्दी, खोकला, घसा खवखवणे, सौम्य ताप, अंगदुखी यासारखी सामान्य फ्लूसारखेच लक्षणं निर्माण करतात. जसे की .
महामारी तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर यांचं म्हणणं आहे की, २०२० मध्ये जशी परिस्थिती होती, तशी परिस्थिती आज नाही. आजचे वेरिएंट्स तुलनेने सौम्य आहेत आणि रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, मात्र सावध राहणं आवश्यक आहे.
जरी सामान्य लोकांसाठी फारसा धोका नसला तरी काही गटातील लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल:
ज्येष्ठ नागरिक
डायबिटीज, अस्थमा, हृदयरोग किंवा कॅन्सरग्रस्त रुग्ण
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे (इम्युनो-कॉम्प्रोमाईज्ड)
या व्यक्तींमध्ये संसर्ग गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते.
१. मास्कचा वापर
भीडभाड असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं अजूनही एक प्रभावी उपाय आहे. खास करून प्रवास करताना, हॉस्पिटलमध्ये किंवा गर्दीच्या बाजारात जाताना मास्कचा वापर अवश्य करा.
२. स्वच्छतेची काळजी
हात वारंवार साबणाने धुणं किंवा सॅनिटायझरचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. खोकताना किंवा शिंकताना रूमाल किंवा कोपराचा वापर करा.
३. सामाजिक अंतर राखा
सामाजिक अंतर राखण्याची सवय अजूनही उपयोगी ठरते. विशेषतः लक्षणं असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळा.
४. लसीकरणाची तपासणी करा
आपल्या शेवटच्या कोविड लसीकरणानंतर एक वर्षाहून अधिक काळ गेला असेल तर बूस्टर डोसबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.
५. लक्षणं दिसल्यास तपासणी करा
सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे यांसारखी लक्षणं आढळल्यास कोविड चाचणी करून घेणं उत्तम. लक्षणं सौम्य असली तरी घरात इतर लोकांचा संसर्ग होऊ नये म्हणून विलगीकरण पाळा.
सध्याचा कोरोना संसर्ग हा २०२०-२१ सारखा गंभीर नसला, तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. सतत बदलत जाणाऱ्या वेरिएंट्समुळे परिस्थिती वेगाने बदलू शकते. त्यामुळे खबरदारी घेणं आणि वेळेवर तपासणी व उपचार करणं हे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आरोग्य संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करून आपण स्वतःचा आणि समाजाचा बचाव करू शकतो.