पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात करा 'या' आयुर्वेदिक पदार्थाचे सेवन
राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पसरतात. सर्दी, खोकला किंवा इतर आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. आरोग्य सुधारण्यासाठी आहारात अनेक पालेभाज्या, फळे, भाज्या इत्यादी पदार्थांचे आवर्जून सेवन केले जाते. मात्र पावसाळ्यात लसूण आर्वजून खाल्ली जाते. लसूण खाल्यामुळे बिघडलेले आरोग्य सुधरण्यास मदत होते. मागील अनेक वर्षांपासून आहारात लसूणचे सेवन केले जात आहे. लसूण खाणे आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठी अतिशय प्रभावी आहे. म्हणूनच आज आम्ही पावसाळ्यात लसूण खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लसूण खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. लसणीमध्ये असलेले घटक सर्दी खोकल्यापासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. पावसाळ्यातील लहान मोठ्या आजारांपासून सुटका मिळण्यासाठी आहारात लसूण खावी. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर लसूण काढा किंवा लसूण तुपात भाजून खाल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल. लसूणमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आढळतात.
बऱ्याचदा आहारात बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी लसूण खावी. लसूण खाल्ल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात लसूण खावी. यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक पाकळी लसूण चावून खावी आणि त्यावर कोमट पाणी प्यावे.
हृदयाच्या बिघडलेले आरोग्य सुधरण्यासाठी आहारात लसूण खावी. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा होण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉलची थर रक्तवाहिन्यांमध्ये तसाच साचून राहतो. हा थर कमी करण्यासाठी आहारात लसूण खावी. याशिवाय जेवणातील पदार्थ बनवताना लसूणचा वापर करावा.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात लसूण खावी. सतत गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात लसूण खावी. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण खावी. लसूणमध्ये आढळून येणारे गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.