पुरुष नसबंदीचं प्रमाण नक्की किती? महाराष्ट्रातील या जिल्ह्यात इतक्या पुरुषांनी केली नसबंदी
देशभरातील एम्समध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. किमान १० एम्स रुग्णालयांमध्ये फॅकल्टीत एक तृतीयांश प्राध्यापक पदे रिक्त आहेत. या एम्स रुग्णालयांमध्ये बोटावर मोजता येतील एवढेच वरिष्ठ डॉक्टर उरले आहेत. फॅकल्टी म्हणजे ते डॉक्टर जे उपचार करण्यासह शिकवतात. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांना फॅकल्टी म्हणतात. एम्स रुग्णालयांच्या कोणत्याही विभागातील सर्वात वरिष्ठ डॉक्टर प्राध्यापक असतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे देशातील १२ एम्समध्ये प्राध्यापक पदांपैकी अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. यापैकी एम्समध्ये ६५ टक्क्यांहून अधिक प्राध्यापक पदे रिक्त आहेत.
तरूणांमध्ये ट्रेंड होतेय नवी लव्ह स्टाईल, Reverse Catfishing म्हणजे रे काय भाऊ?
सर्वात ६वाईट परिस्थिती एम्स जम्मूची आहे. येथे ३३ प्राध्यापक मंजूर आहेत, परंतु फक्त ४ प्राध्यापक कार्यरत आहेत. एम्स रायबरेलीत जम्मूपेक्षा ३ जास्त प्राध्यापक आहेत. रायबरेलीतही प्राध्यापकांची ३३ पदे मंजूर आहेत, त्यापैकी २६ पदे रिक्त आहेत. एम्स देवघरमध्ये ७२ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. येथे ३३ पैकी २४ पदे रिक्त आहेत. याशिवाय, एम्स भटिंडा, बिलासपूर, गोरखपूर, बिबीनगर, नादिया येथे ६० टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत.
एखाद्या विभागात प्राध्यापक नसतात तेव्हा जबाबदारी अतिरिक्त प्राध्यापकांवर असते. अतिरिक्त प्राध्यापक देखील सनिअर फॅकल्टी असतात. प्राध्यापकांप्रमाणेच अनेक एम्समध्ये अतिरिक्त प्राध्यापकांची पदे देखील रिक्त आहेत. एकूण ८ एम्स आहेत ज्यात अतिरिक्त प्राध्यापकांच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. यापैकी ५ एम्समध्ये अतिरिक्त प्राध्यापकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. रायबरेली एम्समध्ये अतिरिक्त प्राध्यापकांच्या २६ पदांना मंजुरी आहे, परंतु केवळ ५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, एम्स भटिंडा, बिलासपूर, गोरखपूर, जम्मू येथे अतिरिक्त प्राध्यापकांच्या २६ पदांना मंजुरी आहे. परंतु नियुक्त्या १२ पेक्षा कमी आहेत.
सर्दीला म्हणा गुडबाय! गरम पाण्याची वाफ घेताना पाण्यात टाका ‘हे’ बारीक दाणे, छातीतील कफ होईल मोकळा
सहयोगी प्राध्यापकांची परिस्थिती अतिरिक्त प्राध्यापकांसारखीच आहे. ९ एम्समध्ये सहयोगी प्राध्यापकांच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. भटिंडा, बिलासपूर, जम्मू आणि रायबरेली येथील एम्स संस्थांमध्ये सहयोगी प्राध्यापकांच्या ४० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. रायबरेलीत तर ५० टक्के पदे रिक्त आहेत. वरिष्ठ प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या मुद्द्यावर एम्सचे एक वरिष्ठ डॉक्टर म्हणाले, सर्वात मोठी समस्या म्हणजे मुलांचे शिक्षण. एम्स अशा ठिकाणी बांधले जातात जिथे चांगल्या शाळा एकतर नाहीत किंवा खूप दूर आहेत. यामुळे डॉक्टर एम्समध्ये येण्याचे टाळतात. एम्समध्ये जाणाऱ्या डॉक्टरांना ना जास्त सुविधा मिळतात, ना खासगींप्रमाणे पैसे. काही डॉक्टर ज्यांना त्यांच्या घराजवळ एम्स मिळतात, ते जाण्यास तयार असतात. नाहीतर कोणी का जाऊ इच्छित असेल.