रिव्हर्स कॅटफिशिंग म्हणजे काय (फोटो सौजन्य - iStock)
रिव्हर्स कॅटफिशिंग समजून घेण्यापूर्वी, तुम्हाला कॅटफिशिंग म्हणजे काय हे माहित असले पाहिजे. कॅटफिशिंग म्हणजे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खोट्या किंवा अधिक आकर्षक पद्धतीने लोकांना तुमची ओळख दाखवणे. फोटोशॉप केलेले चित्र, बनावट प्रोफाइल किंवा बनावट ओळख तयार केली जातात. रिव्हर्स कॅटफिशिंग हे याच्या अगदी उलट आहे. रिव्हर्स कॅटफिशिंग जेन झेड डेटिंग स्ट्रॅटेजी आहे असं म्हटलं जातं.
यामध्ये, लोक जाणूनबुजून ऑनलाइन स्वतःला कमी आकर्षक दाखवतात, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्यांना वास्तविक जीवनात पाहून धक्का बसेल. आजची तरुण पिढी खोटेपणा दाखवून कंटाळली आहे. त्यांना कोणालाही प्रभावित करायचे नाही, तर आपण किती खरे आहोत हे जे समजून घेईल त्याच्याशी वा तिच्याशीच त्यांना नातं निर्माण करायचे आहे. तर रिव्हर्स कॅटफिशिंगबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेऊया. येथे तुम्हाला हा नवीन डेटिंग ट्रेंड अधिक चांगल्या प्रकारे समजेल. समुदेशक अजित भिडे यांनी सविस्तरपणे याबाबत सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock)
खरेपणाची गरज
Gen Z ही डिजीटल जगात वाढलेली पिढी आहे. त्यांना माहीत आहे की फिल्टर, चांगली प्रकाशयोजना किंवा अधिक विचारपूर्वक लिहिलेला सोशल मीडियावर असणारा बायो सत्य कशा पद्धतीने लपवू शकते. म्हणून आता ही पिढी दिसणारा भाग मागे सोडून वास्तवाचा शोध घेत आहे. त्यांना माणसांमधील खरेपणाची गरज अधिक भासते आहे.
ChatGPT तुमचं नातं वाचवू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं AI Therapy Trend नात्यासाठी योग्य आहे की नाही
दिखाव्यापासून दूर
प्रत्येकजण आता जिम सेल्फी, परदेशी सहली आणि परिपूर्ण जीवनशैलीच्या मागे धावत नाही. जर कोणी त्यांच्या मेस्सी खोलीचा किंवा मेकअपशिवाय फोटो पोस्ट केला तर ते छान मानले जाते. कारण त्याला अधिक सहजता आणि दिखाव्यापासून दूर राहणारी व्यक्ती मानले जाते आणि यामुळे जेन झी अधिक आकर्षित होतात. त्यांना दिखाव्याची गरज वाटत नाहीये.
भावनिक संरक्षण
रिव्हर्स कॅटफिशिंग ही देखील एक प्रकारची संरक्षण यंत्रणा आहे. जर तुम्ही स्वतःला ऑनलाइन असताना आपण किती साधे आहोत किंवा सामान्य म्हणून सादर केले तर तुम्हाला वास्तविक जीवनात प्रभावित होण्याची शक्यता जास्त असते. नाकारण्याची भीतीदेखील कमी असते. कोणी तुमच्याकडून अधिक अपेक्षा करत नाही आणि तुम्ही जसे आहात तसे स्वीकारता.
हा ट्रेंड काय शिकवतो?
रिव्हर्स कॅटफिशिंग हा केवळ एक मजेदार ट्रेंड नाही. सामाजिक संवादात प्रामाणिकपणा आणि कनेक्शनची खोली या दिशेने हे एक पाऊल आहे. Gen Z दाखवत आहे की खरे नातेसंबंध निर्माण करण्यासाठी परिपूर्णतेची नाही तर मानवता आणि सत्याची आवश्यकता असते. रिव्हर्स कॅटफिशिंग हा ढोंगाच्या जगात प्रामाणिकपणा स्वीकारण्याचा मार्ग आहे. Gen Z आता फिल्टर आणि ओव्हर प्रेझेंटेशनपासून दूर जाऊन प्रामाणिकपणा आणि खऱ्या कनेक्शनकडे वाटचाल करत आहे.
हा ट्रेंड केवळ एक शैली नाही तर विश्वास, साधेपणा आणि भावनिक कनेक्शनची नवीन व्याख्या बनत आहे. जेव्हा प्रत्येकजण सर्वोत्तम दिसण्याच्या शर्यतीत असतो, तेव्हा Gen Z चा रिव्हर्स कॅटफिशिंग फॉर्म्युला नातेसंबंधांच्या जगात एखाद्या फ्रेश श्वासासारखा दिसून येत आहे.