Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Waqf Amendment Bill : ‘वक्फ’च्या विरोधात अनेक राज्यांत मुस्लिम बांधव रस्त्यावर; असदुद्दीन ओवैसींची सर्वोच्च न्यायालयात धाव

वक्फ सुधारणा विधेयकावरून देशातील मुस्लिम समाजात दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही मुस्लिम नेते वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने जनजागृती करत आहेत तर काही या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 05, 2025 | 10:53 AM
Waqf Amendment Bill : 'वक्फ'च्या विरोधात अनेक राज्यांत मुस्लिम बांधव रस्त्यावर; असदुद्दीन ओवैसींची सर्वोच्च न्यायालयात धाव

Waqf Amendment Bill : 'वक्फ'च्या विरोधात अनेक राज्यांत मुस्लिम बांधव रस्त्यावर; असदुद्दीन ओवैसींची सर्वोच्च न्यायालयात धाव

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने करण्यात आली. नमाजनंतर, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये दर्गे आणि मशिदींवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेश अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अश्फाक सैफी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. त्यांच्या विधेयकाविरुद्ध काँग्रेस आणि एमआयएमने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोलकाता-अहमदाबादमध्ये वक्फ बिलाची पोस्टर्स जाळण्यात आली. गुजरातमधील अहमदाबादमध्ये मुस्लिम समुदायातील शेकडो लोक रस्त्यावर जमले. त्यांच्या पोस्टर्स आणि बॅनरवर लिहिले होते, वक्फ बिल परत घ्या, यूसीसी नाकारा. पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतले.

कोलकाता येथील पार्क सर्कस क्रॉसिंगवर हजारो लोक रस्त्यावर जमले. येथेही लोक वक्फ विधेयक रद्द करण्याची मागणी करणारे बॅनर व पोस्टर्स घेऊन निषेध केला.

ओवैसी, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात

वक्फ विधेयकाविरुद्ध बिहारमधील किशनगंज येथील काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. ज्यामध्ये ते मुस्लिम समुदायाविरुद्ध भेदभाव करणारे आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे असल्याचे म्हटले आहे. लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद मोहम्मद जावेद हे वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 वरील संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) सदस्य होते.

वांद्रे येथे दोन मुस्लिम गट आमने-सामने

वक्फ सुधारणा विधेयकावरून देशातील मुस्लिम समाजात दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही मुस्लिम नेते वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने जनजागृती करत आहेत तर काही या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. मुंबईत वांद्रे येथे मुस्लीम समाजातील दोन गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. वांद्रे येथे काही मुस्लिम नेते याविषयी जनजागृती करत असताना एका गटाने त्यांना विरोध केला. त्यातून त्यांच्यात वाद झाला.

खूप चांगले विधेयक

विधेयकाच्या बाजूने असणाऱ्या गटाचे म्हणणे आहे की, हे खूप चांगले विधेयक असून काही जण राजकीय पोळी भाजण्यासाठी, त्यांचं वर्चस्व टिकवण्यासाठी आमच्या समाजाची दिशाभूल करत आहे. त्यांची माथी भडकवत आहेत. आमचा समाज आणि बहुसंख्याक यांच्यात दंगल घडवण्याचा प्लॅन केला जात आहे.

मुस्लिमांमध्ये गैरसमज नको

मुस्लिमांमध्ये गैरसमज नको, देशातील एकता, अखंडता कायम राहण्यासाठी आम्ही कॅम्पेन चालवत आहोत. आमचे कार्यकर्ते प्रत्येक मशिदीबाहेर लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहोत असे त्यांनी सांगितले. मुस्लीम समाजातील काही जणांच्या जनजागृती मोहीमेतच विधेयकाचा विरोध करणारा गट समोर आला. हे दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

Web Title: Muslim community take to the streets in many states against waqf amendment bill nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • Latest Political News
  • Waqf Amendment Bill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.