Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दाखल; घटनास्थळासह रमेश विश्वास यांची घेतली भेट

पंतप्रधान मोदींचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला आहे. गुजरात हे पंतप्रधान मोदींचे गृहराज्य आहे. २००१ ते २०१४ पर्यंत ते सलग चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 13, 2025 | 10:56 AM
Ahmedabad Plane Crash:  नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दाखल; घटनास्थळासह रमेश विश्वास यांची घेतली भेट
Follow Us
Close
Follow Us:

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जण मृत्यूमुखी पडले. यापैकी २४१ जण विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, तर उर्वरित पाच मृतदेह विमान कोसळलेल्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील रहिवाशांचे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अपघातावेळी वसतिगृहात ५० हून अधिक लोक उपस्थित होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार MBBS विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, वसतिगृहातील एकूण मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

Air India Plane Crash: मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी परतले; नेमकं झालं काय?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अहमदाबादला पोहोचले. त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल पीडितांची भेट घेऊन त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली. या भेटीत ते सुमारे १० मिनिटे उपस्थित होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याचे दु:खद वृत्त आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत फक्त एकच प्रवासी बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अहमदाबादला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट घटनास्थळाला भेट दिली. यानंतर त्यांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल गाठले आणि अपघातातून वाचलेले एकमेव व्यक्ती रमेश विश्वास कुमार यांनाही भेट घेतली. सध्या रमेश विश्वास यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पंतप्रधान आज या अपघाताबाबत आढावा बैठकही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना; 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश

मोदी चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री

पंतप्रधान मोदींचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला आहे. गुजरात हे पंतप्रधान मोदींचे गृहराज्य आहे. २००१ ते २०१४ पर्यंत ते सलग चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. गुजरातमधील त्यांच्या सातत्यपूर्ण राजकीय यशामुळे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली. पंतप्रधानांच्या गृहराज्यात घडलेल्या या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.

अपघातात माजी मुख्यमंत्र्यांचाही मृत्यू

गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ भाजप नेते विजय रुपाणी यांचेही निधन झाले. एअर इंडिया फ्लाइट A171 अपघातात गुजरातमधील आणंद येथे राहणाऱ्या 33 जणांना आपला जीव गमवावा लागला. आणंदचे जिल्हाधिकारी प्रवीण चौधरी म्हणाले की, यादीची तपासणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १२ जण राजस्थानचे आहेत. या अपघातात बांसवाडा येथील रहिवासी डॉ. दीपक, त्यांची पत्नी, मुलगी आणि दोन जुळ्या मुलांचाही मृत्यू झाला.

Web Title: Narendra modi arrives in gujarat meets ramesh vishwas at the incident site

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • Air India. Plane Crash
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका
2

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?
3

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…
4

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.