
देशाला विकसित भारत बनविण्याचा मोदींचा संकल्प: मुख्यमंत्री योगी
गुजरात / भारत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वारसा, विकास आणि गरीब कल्याणाच्या परंपरेला बळकटी देत सध्याच्या पिढीला नवी प्रेरणा दिली असून देशाला “विकसित भारत” म्हणून स्थापन करण्याचा दृष्टीसंकल्प दिला असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित भारत पर्व समारंभात बोलतांना सांगितले. मुख्यमंत्री योगी म्हणाले की पंतप्रधान मोदी काशीचे प्रतिनिधित्व संसदेत करतात. काशी विश्वनाथ धामाच्या पुनर्निर्माणानंतर दरवर्षी ११ ते १२ कोटी भाविक काशीला भेट देतात. अयोध्येत अनेक पिढ्या राम मंदिर बांधण्याच्या आशेने गेल्या, परंतु मोदीजींनी हे स्वप्न साकार केले आणि अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिले. आज अयोध्या देशातील सर्वात सुंदर नगरांपैकी एक बनली आहे, जिथे दरवर्षी ६ ते ८ कोटी भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येतात.”
सीएम योगींनी यांनी सांगितले की, “मथुरा-वृंदावन असो वा उत्तराखंडातील केदारनाथ- बद्रीनाथ धामाचे पुनरुज्जीवन, मध्य प्रदेशातील महालोक असो वा देशभरातील वारसा स्थळांचे संवर्धन – सर्व ठिकाणी आधुनिक पायाभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत. शेतकरी, युवक, कामगार आणि महिलांच्या आकांक्षांनुसार भारताचा सर्वांगीण विकास होत आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे श्रद्धा आणि वारशाच्या सन्मानाचे प्रतीक असून, प्रत्येक भारतीय त्यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो.”
स्टॅच्यू ऑफ युनिटी भारताच्या एकतेचे प्रतीक: मुख्यमंत्री योगी म्हणाले, “२०१८ मध्ये मला स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी नुकतीच ती राष्ट्राला समर्पित केली होती. गेल्या सात वर्षांत येथे जबरदस्त बदल झाला आहे. एक ओसाड जागा कशी जागतिक पर्यटनाचे केंद्र बनू शकते, हे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवरच्या किनाऱ्यावर झालेल्या विकासातून दिसून येते. आज पुन्हा एकदा येथे येण्याचे भाग्य लाभले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी ही भारताच्या एकतेची मूर्ती आहे. हे पीएम मोदींच्या दूरदृष्टीचे फलित आहे. त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारत आपला वारसा सन्मानाने जपत आहे आणि महापुरुषांच्या कार्यांना भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनवत आहे.”
मुख्यमंत्री योगींनी सांगितले, “सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या अखंडतेचे खरे शिल्पकार होते. ब्रिटीशांना भारत एकसंध राहावा असे नव्हते. त्यांनी भारताचे केवळ भारत आणि पाकिस्तान असे विभाजनच केले नाही, तर देशाचे तुकडे करण्याचा कट रचला होता, जेणेकरून भारत पुन्हा एकत्र येऊ नये. मात्र, लोहपुरुष सरदार पटेल यांनी आपल्या दूरदृष्टीच्या बळावर ५६३ देशी संस्थानांना भारत गणराज्यात विलीन करून आजचा ‘एक भारत’ निर्माण केला. आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मागील ११ वर्षांत भारताला ‘श्रेष्ठ भारत’ बनविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.”
मुख्यमंत्री योगी म्हणाले, “जुनागढचा नवाब आणि हैदराबादचा निजाम भारत गणराज्यात सहभागी होण्यास तयार नव्हते. परंतु सरदार पटेल यांनी ठाम शब्दांत सांगितले की, ‘प्रेमाने याल तर ठीक, नाहीतर दुसरे मार्गही आहेत.’ अखेरीस त्यांना देश सोडून पळावे लागले.” ते पुढे म्हणाले, “आजचा नवभारत देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेशी कोणतीही तडजोड करत नाही. भारताच्या सुरक्षेला धक्का देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावीच लागेल. मागील ११ वर्षांत देशाने पाहिले आहे की नवभारत योग्य वेळी ठोस प्रत्युत्तर देतो.