
AI Impcat Expo 2026 India is most successful emerging economy say UN Chief Antonio guterres
अँटोनियो गुटेरेस AI शिखर परिषेदत सहभागी होण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांनी या दौऱ्यावर येण्यापूर्वी भारताचे प्रचंड कौतुक केले आहेत. तसेच त्यांनी AI केवळ विकसित देशांपूरता मर्यादित राहाणे हे त्यांना अस्वीकार्य आहे. त्यांचे हे विधान त्यांनी अमेरिका आणि चीनला उद्देशून म्हटले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहेत.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी भारातचे कौतुक करताना म्हटले की, भारत ही जगातली अत्यंत प्रभावी आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. AI परिषदेसाठी भारत हे उत्तम स्थान असल्याचे गुटेरेस यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुलाखतीदरम्यान गुटेरेस यांनी AI परिषेदवर बोलताना म्हटले की, कृत्रिम बुद्धमत्ता (Artificial Intelligence) म्हणजेच AI फायदा केवळ विकसित देशांपुरता किंवा महासत्तांसाठी राखीव नसावा त्यांच्या मते, याचा फायदा संपूर्ण जगाला झाला पाहिजे. मानवेतेच्या हितासाठी AI वापर महत्वाचा असल्याचे गुटेरेस यांनी स्पष्ट केले. त्यांनी असेही म्हटले की, या परिषदेत भारताची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. भारताची अर्थव्यवस्था केवळ ग्लोबल साउथमध्येच नव्हे, तर जागतिक घडामोडींमध्ये देखील महत्वाची भूमिका बजावते असे त्यांनी म्हटले.
भारतात AI Impcat Expo 2026 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत हे संमेलन असणार असून दिल्लीतील भारत मंडपम येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय असे या परिषदेचे घोषवाक्य आहे. लोक, ग्रह आणि विकास या तीन मूल्यांवर आधारित ही परिषद आहे. ग्लोबल साउथमध्ये पहिल्यांदाच या मोठ्या AI परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
या परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) , ब्राझीलचे (Brazil) अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांसारखे जागतिक नेत्यांचा सहभाग असणार आहे. तसेच १७ फेब्रुवारी पासून लोकांसाठी देखील ही संमेलन खुले असणार आहे.
Ans: संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी भारताचे तोंडभरुन कौतुक केले असून भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातील प्रभावी आणि उदयोन्मुख असल्याचे म्हटले.
Ans: AI Impcat Expo 2026 परिषदेचा हेतू एआय तंत्रज्ञानाचा लाभ सर्व देशांना, विशेष करुन विकसनशील देशांना मिळवून देणे आणि त्याच्या विकासावर चर्चा करणे आहे.
Ans: AI Impcat Expo 2026 परिषद लोक, ग्रह, विकास या तीन मुल्यांवर आधारित आहे.
Ans: सर्वजण हिताय, सर्वज सुखाय असे AI Impcat Expo 2026 परिषदेचे घोषवाक्य आहे.
Ans: अँटोनियो गुटेरेस यांच्या मते, एआय चा उपयोग केवळ विकसित देशांपूरता मर्यादित नसावा. त्याचा विकसनशील देशांनाही फायदा व्हावा आणि यासाठी ग्लोबल साउथमध्ये भारत हे उत्तम ठिकाण असल्याचे त्यांनी म्हटले.