
Karnataka High Court Landmark Judgment
न्यायालयाने स्पष्ट केले की, घरातील कामे करणे किंवा सासू-सासऱ्यांची सेवा करणे हे पत्नीचे ऐच्छिक काम आहे. आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्याची प्राथमिक जबाबदारी ही त्यांच्या स्वतःच्या मुलांची आहे, सुनांची नाही. पत्नीवर तिच्या मनाविरुद्ध ताबा मिळवणे किंवा माहेरी जाण्यासाठी परवानगी सक्तीची करणे हे मानवी सन्मान आणि सामाजिक न्याय या संवैधानिक मूल्यांच्या विरोधात आहे, असे निरीक्षण यावेळी कोटाने नोंदविले.
पुरुषांनीही घरात कामे करावी न्यायमूर्ती डॉ. चिलकूर सुमालता यांच्या खंडपीठाने म्हटले की, केवळ लिंगाच्या आधारावर एखाद्या महिलेचे स्वातंत्र्य मर्यादित करणे हे समानतेव्या घटनात्मक तत्त्वांच्या आणि मानवी प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. घरातील कामे पुरुष आणि महिला दोघांनीही समानतेने वाटून घेतली पाहिजेत. सध्याची महागाई आणि जीवनमानाचा खर्च पाहता दरडोई १५० रुपये प्रतिदिन ही रक्कम अगदी तुटपुंजी आहे, असे स्पष्ट करत हायकोर्टाने पतीची याचिका फेटाळून लावत कौटुंबिक न्यायालयाची ९,००० ची मासिक पोटगी कायम ठेवली.
पत्नीच्या काळ्या रंगावर, कमी बुद्धिमत्तेवर किंवा लाजाळ स्वभावावर टोमणे मारणे हे गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही. अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी करत झारखंड हायकोर्टाने पतीविरोधात सुरू असलेला गुन्हेगारी खटला रद्द केला. जस्टिस अनिल कुमार चौधरी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, रंग-रूपावर टोमणे मारणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असू शकते, परंतु हा गुन्हेगारी खटला चालवण्याचा आधार ठरू शकत नाही. ऑनलाइन मॅट्रिमोनियल साईटवरून झालेल्या या लग्नानंतर वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये पत्नीने असा आरोप केला होता की, पती तिच्या रंगावर आणि बोलण्याच्या पद्धतीवरून तिला सतत टोमणे मारत असे.