१. झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला आयईडी ब्लास्ट
२. आयईडी ब्लास्टमध्ये सीआरपीएफचे जवान जखमी
३. जखमी जवानांना रांचीमध्ये एअरलिफ्ट केले जाणार
झारखंड/CRPF: गेल्या काही वर्षांत केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवादाविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या सीमेलगत नक्षलवादाचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. मात्र आता सुरक्षा यंत्रणांनी याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. झारखंडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी पेट्रोलिंग करणाऱ्या सुरक्षा यंत्रणेच्या पथकाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये २ जवान जखमी झाले आहेत.
नक्षलवाद्यांनी झारखंडच्या चाईबासामध्ये सीआरपीएफच्या पथकाला आयईडी ब्लास्ट करून लक्ष्य केले. यामध्ये २ सीआरपीएफ जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आधीच या ब्लास्टचे नियोजन केले होते असे म्हटले जात होते. जवानांचे पथक गस्तीला निघाले तेव्हा त्यांनी ब्लास्ट केले. हा धमाका इतका जोरदार होता की याचा आवाज खूप दूरवर ऐकू गेल्याचे सांगितले जात आहे.
जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांना रांचीला एअरलिफ्ट केले जाण्याची शक्यता आहे. या घटनांनंतर सीआरपीएफच्या जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. परिसराला वेढा घालण्यात आला आहे. नक्षलवाद्यांचा शोध सुरु आहे. या परिसरात अनेकदा जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून करण्यात आला आहे.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांच्या विरोधात पेट्रोलिंग करण्यासाठी सीआरपीएफचे पथक गस्तीवर निघाले होते. याच दरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला. यामध्ये २ जवान जखमी झाले आहेत. दोन्ही जवानांना सारडा जंगलातून रांचीला पुढील उपचारांसाठी एअरलिफ्ट केले जाणार आहे. जून महिन्यात देखील आयईडी ब्लास्टमध्ये एक जवान शहीद झाले होते.
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई
छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात सुरक्षादलानी मोठी कामगिरी केली आहे. बासागुडा आणि गंगलूर पोलिस ठाण्यांच्या सीमेलगत असलेल्या जंगलात शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश असून त्यांच्यांवर १७ लाखांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. रविवारी दुपारपर्यंत चकमक सुरू होती.
दक्षिण सब झोनल ब्युरोशी संबंधित नक्षलवाद्यांविरोधात ही कारवाई सुरू होती. ठार करण्यात आलेल्यांमध्ये तीन एरिया कमिटी मेंबर (ACM) आणि एका नक्षलवादी कमांडरचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी या भागात विश्वसनीय माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन सुरू केले होते. विशेष म्हणजे या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, स्फोटकं, आणि नक्षल संबंधित सामग्री हस्तगत करण्यात आली आहे.