बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, लाखो रुपयांची बक्षिसं असलेले चार नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश
छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात सुरक्षादलानी मोठी कामगिरी केली आहे. बासागुडा आणि गंगलूर पोलिस ठाण्यांच्या सीमेलगत असलेल्या जंगलात शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश असून त्यांच्यांवर १७ लाखांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. रविवारी दुपारपर्यंत चकमक सुरू होती.
महिला ASI च्या जीवावर बेतलं लिव्ह इन रिलेशन; CRPF जवानाने गळा दाबून केली हत्या
दक्षिण सब झोनल ब्युरोशी संबंधित नक्षलवाद्यांविरोधात ही कारवाई सुरू होती. ठार करण्यात आलेल्यांमध्ये तीन एरिया कमिटी मेंबर (ACM) आणि एका नक्षलवादी कमांडरचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी या भागात विश्वसनीय माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन सुरू केले होते. विशेष म्हणजे या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, स्फोटकं, आणि नक्षल संबंधित सामग्री हस्तगत करण्यात आली आहे.
मृत नक्षलवाद्यांमध्ये हुंगा (प्लाटून क्र. १०, इनाम ५ लाख), लक्खे (प्लाटून क्र. ३०, इनाम ५ लाख), भीमे (दक्षिण सब झोनल ब्युरो, इनाम ५ लाख) आणि निहाल उर्फ राहुल (संतोष, कम्युनिकेशन टीम प्रमुखाचा अंगरक्षक, इनाम २ लाख) यांचा समावेश आहे.
बीजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितले की, डीआरजीच्या विशेष पथकाने या नक्षलवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवून ही रणनीतिक कारवाई केली. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत, मुसळधार पावसात, घनदाट जंगलांमध्ये आणि उंचसखल भागांत ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय नौदलात दाखल होणार INS Nistar ; ड्रॅगनवर असणार करडी नजर, काय आहेत वैशिष्ट्ये?
बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितलं की, २०२४ मध्ये मिळालेली निर्णायक आघाडी २०२५ मध्येही कायम ठेवली जात आहे. जानेवारी २०२४ पासून जुलै २०२५ पर्यंत बस्तर विभागात ४२५ हार्डकोर नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत, ही सुरक्षा दलांच्या रणनीती आणि जनतेच्या सहकार्याची साक्ष असल्याचं ते म्हणाले.