rajnath singh
नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ‘केवळ भारतातच नाही तर जगभरातील विश्लेषक एनडीए 400 जागांचा टप्पा पार करत असल्याचं सांगत आहेत. नेता तो असतो जो कामं पूर्ण करतो. एनडीए 400 जागा पार करणार आहे’, असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या पाच टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर सहाव्या टप्प्यातील मतदान लवकरच होत आहे. तत्पूर्वी एका जाहीरसभेत राजनाथसिंह यांनी विजय हा एनडीएचा होणार असल्याचे विधान केले. ‘भारतातच केवळ नाही तर जगभरातील विश्लेषक एनडीए 400 जागांचा टप्पा पार करत असल्याचं सांगत आहेत. नेता तो असतो जो कामं पूर्ण करतो’.
केजरीवाल यांच्याबाबतही त्यांनी विधान केले. ‘ते म्हणायचे की ते सरकारी घरात राहत नाहीत, पण आता ते शीशमहलमध्ये राहतात. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांची इंडिया आघाडी चालणार नाही.’
राजनाथसिंहांना चांदीचा मुकूट
दिल्लीत आल्यानंतर राजनाथसिंह यांना चांदीचा मुकूट घालण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितलं की, निवडणुकीनंतर हा मुकूट विकून काही गरिबाच्या मुलींसाठी पैंजण बनवा.