Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Next CM of Kerala: केरळमध्ये काँग्रेसचा ‘सस्पेन्स’ कायम; ‘या’ तीन नेत्यांची नावं चर्चेत

Kerala Assembly Election Results 2026 : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सध्या के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला आणि व्ही. डी. सतीशन यांची नावं आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 08, 2026 | 03:42 PM
Kerala Politics, Congress, KC Venugopal, Ramesh Chennithala, VD Satheesan, Kerala CM Race,

Kerala Politics, Congress, KC Venugopal, Ramesh Chennithala, VD Satheesan, Kerala CM Race,

Follow Us
Close
Follow Us:
  • के. सी. वेणुगोपाल: राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि राष्ट्रीय राजकारणातील मोठा अनुभव
  • रमेश चेन्निथला: राज्यातील संघटनेवर मजबूत पकड असलेले अनुभवी नेते
  • व्ही. डी. सतीशन: तरुणांमध्ये लोकप्रिय आणि आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून ओळख.
Kerala Assembly Election Results 2026 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता या राज्यांमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या हालचाली सुरू आहे. तर तामिळनाडूमध्येही सत्तासंघर्षाच्या घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे केरळमध्येही काहीशी तशीच परिस्थिती आहे.

दरम्यान, केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पाच दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित झालेला नाही. तब्बल दहा वर्षांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) सत्तेत परतला असला, तरी सरकार स्थापनेबाबत पक्षांतर्गत चर्चा आणि हालचाली सुरूच आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री निवडीसाठी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Kerala Election Results : केरळमध्ये UDF ने सुरुवातीच्या कलात बहुमताचा …

मुख्यमंत्री निवडीसाठी तीन प्रमुख निकष

दरम्यान, काँग्रेसकडून मुख्यमंत्री निवडताना तीन प्रमुख घटकांवर भर दिला जाणार असल्याची माहिती आहे. सर्वप्रथम नव्याने निवडून आलेल्या आमदारांचे मत जाणून घेतले जाणार आहे. त्यानंतर मित्रपक्षांची भूमिका आणि मतांचा आढावा घेतला जाईल. तसेच जनतेमध्ये कोणत्या नेत्याला अधिक पसंती आहे, यासाठी लोकमताचाही अंदाज घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत तीन दिग्गज

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सध्या के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला आणि व्ही. डी. सतीशन यांची नावं आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय, काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या तिन्ही नेत्यांशी चर्चा करणार आहे.जर तिन्ही नेत्यांनी पक्षाच्या निर्णयाला सहमती दर्शवली, तर मुख्यमंत्रीपदाची घोषणा तातडीने केली जाईल. मात्र, मतभेद झाल्यास संबंधित नेत्यांना दिल्लीला बोलावून चर्चा केली जाणार असल्याचेही समोर आले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत मित्रपक्षांनी स्वतंत्र भूमिका मांडली असली, तरी अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडच घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे सहयोगी पक्षांच्या भूमिकेचा अंतिम निर्णयावर फारसा परिणाम होणार नसल्याचे मानले जात आहे.

Kerala Assembly Election : केरळात झाली तिरंगी लढत; आता राज्यातील …

केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी के. सी. वेणुगोपाल यांचे नाव आघाडीवर

केरळचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत काँग्रेस पक्षाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी पक्षातील सूत्रांकडून के. सी. वेणुगोपाल यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि अलाप्पुझाचे खासदार असलेले वेणुगोपाल हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

पक्ष संघटन मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे के. सी. वेणुगोपाल यांना राष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचा मोठा फायदा मिळू शकतो, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी पक्षाच्या रणनीती आखण्यात आणि विविध राज्यांतील संघटनात्मक कामकाजात सक्रिय सहभाग घेतला आहे.

संघटन कौशल्यामुळे वेणुगोपाल चर्चेत

काँग्रेस पक्षातील सूत्रांच्या मते, वेणुगोपाल यांनी पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय राजकारणातील अनुभव, पक्ष नेतृत्वाशी असलेले निकटचे संबंध आणि केरळमधील मजबूत जनाधार यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेची संधी मिळाल्यास अनुभवी आणि संघटनात्मकदृष्ट्या सक्षम चेहरा मुख्यमंत्रीपदी देण्याची पक्षाची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Next cm of kerala who will lead the congress government in kerala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 03:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.