CRPF जवानाची २ वर्षांपासून पाकिस्तानसाठी हेरगिरी, संवेदनशील माहिती शेअर केल्याचं उघड
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दिल्लीतील सीआरपीएफ जवान मोती राम जाट याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याची माहिती मिळाली आहे. २०२३ पासून माहिती पुरवली जात होती. त्याबदल्यात त्याला पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांकडून पैसे मिळत होते. दरम्यान त्याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलं असून पटियाला हाऊस कोर्टाने आरोपीला ६ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.
10 कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा
की आरोपी गेल्या २ वर्षांपासून हेरगिरी करत होता. त्याने देशाची महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पाकिस्तानच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत शेअर केली आहे. त्याला पाकिस्तानातून अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी पाठवण्यात आले आहे. हा व्यवहार बहुतेक हवालाद्वारे केला जात होता. तपास संस्थांच्या मते, जवान आधीच आयएसआयच्या निशाण्यावर होता. यामुळेच त्याला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या चौकशीत अडकवण्यात आले आणि अनेक गुप्त माहिती हस्तगत करण्यात आली. ही माहिती देशासाठी धोका निर्माण करू शकते. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की तो २०२३ पासून हे देशद्रोहाचे कृत्य करत होता, अशी माहिती एनआयएने दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो. चौकशीनंतर आणखी अनेक गुपिते उघड होतील. एजन्सी मोतीराम जाटच्या संपर्कात असलेल्या किंवा ज्यांच्या माध्यमातून ही माहिती लीक होत होती त्यांच्यावरही लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं आहे.
किती ती क्रूरता ! पहिले अपहरण मग लैंगिक अत्याचार आणि पुढे…. डोंबिवलीतील चीड येणारी घटना उघडकीस
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानाच्या बँक खात्यांची चौकशी केली जात आहे. यासोबतच त्याच्या कुटुंबातील इतर लोकांची बँक खाती देखील शोधली जात आहेत. पथकाला संशय आहे की पाकिस्तानकडून मिळत असलेले पैसे जवानाच्या कुटुंबाच्या खात्यात जमा होत होते. दरम्यान एनआयएची ही कारवाई संभाव्य धोका रोखण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.