
यापूर्वी, दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटानंतर आणि “व्हाईट कॉलर” मॉड्यूलशी संबंधित शस्त्रे जप्त झाल्यानंतर, पोलिसांनी गेल्या आठवड्यात सोमवारी जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu -Kashmir) पुलवामा आणि श्रीनगर जिल्ह्यांमध्ये रुग्णालयाच्या लॉकरची अचानक तपासणी केली. या तपासणीत तपास पथकाला डॉक्टरांच्या लॉकरमध्ये AK ४७ सह अनेक स्फोटकेही आढळून आली. त्यानंतर एनआयएची आजची कारवाई खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवादी ( Terror Attack) घटकांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर (Delhi Blast)NIAने आपले छापेमारीचे सत्र सुरूच ठेवले आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटांमागील दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी, एनआयएने आपला तपास अनेक राज्यांमध्ये तपासाचा वेग वाढवला आहे. दरम्यान, दिल्ली स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीनला एनआयएच्या पथकाने फरिदाबादला नेले. स्फोटापूर्वी दहशतवाद्यांच्या टोळीने ज्या ज्या ठिकाणी त्यांचे नेटवर्क, बॅकअप सपोर्ट आणि संभाव्य सुरक्षित आश्रय घेतला होता, त्या सर्व ठिकाणांची सखोल चौकशी करण्यात आली. तपास पुढे नेत, एनआयएने लखनौ, कानपूर, सहारनपूर, फरिदाबाद आणि जम्मू आणि काश्मीरला “कोअर झोन” म्हणून घोषित केलं आहे. या भागात हायस्पीड छापे, गुप्तचर ऑपरेशन्स आणि स्थानिक नेटवर्क मॅपिंग सुरू आहेत.
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. उमर नावाच्या कार चालकाने मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ च्या बाहेर ट्रॅफिक स्टॉपजवळ स्वतःला उडवून दिले तेव्हा हा स्फोट झाला.
Ans: दिल्लीतील 10 नोव्हेंबरच्या स्फोटानंतर आणि "व्हाईट कॉलर" दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर, त्या मॉड्यूलशी संबंधित नेटवर्क पूर्णपणे उघड करण्यासाठी एनआयएने काश्मीरसह अनेक राज्यांत छापे टाकले.
Ans: आतापर्यंत काय मोठा पुरावा एनआयएला मिळाला आहे?
Ans: दिल्लीतील स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला?