नितीश कुमार यांच्या मुलाचा राजकारणात प्रवेश होणार? 'निशांत संवाद'द्वारे आज घोषणा करणार?
बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असून राजकीय हालचालीही वाढल्या आहेत. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या यांच्या मुलाचे बिहारमध्ये पोस्टर झळकले आहेत. त्यामुळे राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या तब्येतीवरून मित्र पक्ष आणि विरोधकांनीही त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असतानाच त्यांच्या मुलाच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत.
Robert Vadra यांच्या अडचणीत वाढ; ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे, ‘ते’ 58 कोटी नेमके मिळवले कसे?
काही दिवसांपूर्वी, एकेकाळी त्यांचे जवळचे असलेले उपेंद्र कुशवाह आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनीही त्यांना त्यांचा मुलगा निशांत यांच्याकडे पक्ष सोपवण्याचा सल्ला दिला होता. आता पाटण्यात त्यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत आणि ते रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राज्यात पुढील दोन महिन्यांत निवडणुका होणार आहेत आणि अशावेळी त्यांचा संवाद कार्यक्रमाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पाटण्यात ‘निशांत संवाद’ चे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यांच्या सक्रिय राजकारणाचे हे संकेत मानले जात आहेत. मात्र आतापर्यंत नितीश कुमार किंवा त्यांच्या निशांत यांनी कधीही राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांनाना दुजोरा दिलेला नाही. निशांत यांना याबद्दल विचारले असता ते कोणतेही थेट उत्तर देत नाहीत. मात्र, आता त्यांची सक्रियता ज्या पद्धतीने वाढत आहे, त्यामुळे निश्चितच काही संकेत मिळत आहेत.
नितीश कुमार राजकीय वारसा निशांत कुमार यांच्याकडे सोपवतील का? गेल्या अनेक महिन्यांपासून नितीशकुमार आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. विरोधी पक्ष असा दावाही करत आहेत की भाजपने नितीशकुमार यांच्या खराब प्रकृतीचा फायदा घेऊन पक्ष आणि सरकार हायजॅक केलं आहे. नितीशकुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाईल, असं सर्व पक्ष आणि एनडीएचे वरिष्ठ नेत्यांकडून असं सांगितलं जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तरी, त्यांचं वय आणि आरोग्य पाहता पक्षात पुढच्या पिढीच्या नेत्याची गरज नाकारता येत नाही. नितीश यांच्यानंतर सध्या जेडीयूमध्ये असा कोणताही चेहरा दिसत नाही आणि त्यांच्या मुलाला पक्ष आणि वारसा सोपवण्याची शक्यता आहे.
निशांत कुमार पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावरून समर्थकांशी थेट संवाद साधणार आहेत. जेडीयूशी संबंधित सूत्रांचं म्हणणे आहे की, आगामी निवडणुकीत निशांत कुमार यांची भूमिका वाढू शकते, परंतु त्यांना नितीश यांचे उत्तराधिकारी म्हणून लगेच पुढे आणलं जाणार नाही. जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि नितीश कुमार यांच्या जवळच्या लोकांमध्ये निशांत यांचा लवकरच राजकीय प्रवेश होऊ शकतो, असं दबक्या आवाजात बोललं जात आहे.