Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनांना इंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला पायलट प्रकल्प राबवण्याचा आदेश

नव्या आदेशानुसार नवीन कारसाठी चार वर्षांचा, तर नवीन दुचाकीसाठी सहा वर्षांचा थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 05, 2026 | 07:43 AM
Supreme Court Senior Citizens Rights, Parents Property Rights Law,

Supreme Court Senior Citizens Rights, Parents Property Rights Law,

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : थर्ड पार्टी विम्याशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवर कठोर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. वैध थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन देऊ नये, यासाठी पायलट प्रकल्प सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती संजय करोल आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने हा आदेश देताना रस्ते अपघातातील पीडितांना वेळेत नुकसानभरपाई मिळावी, यासाठी विमा नियमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण तसेच रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाला संयुक्तपणे अशी यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये वाहनाचा विमा वैध असल्याची पडताळणी झाल्यानंतरच इंधन उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेऱ्यांचा वापर करण्याचाही सल्ला न्यायालयाने दिला आहे. राज्य पोलिसांना वाहनाचा विमा तत्काळ तपासता येईल, अशी मोबाईल उपकरणे किंवा अॅप उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर घटनास्थळीच ई-चलान जारी करता येईल.

Dharashiv News : महायुतीतच तुफान राडा ! तानाजी सावंत-राहुल मोटे समर्थक आमनेसामने; दगडफेकीत 12 गाड्यांची तोडफोड

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीच्या २०२४-२५ च्या अहवालानुसार देशातील सुमारे ५६ टक्के वाहने विमाविरहित आहेत. म्हणजेच, देशातील सुमारे ३०.४८ कोटी नोंदणीकृत वाहनांपैकी १६.५४ कोटी वाहने थर्ड पार्टी विम्याशिवाय रस्त्यावर धावत आहेत. मोटार वाहन कायद्यातील कलम १४६ नुसार प्रत्येक वाहनासाठी थर्ड पार्टी विमा बंधनकारक असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली.

नवीन वाहनांसाठी विमा कालावधी वाढणार

सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मधील आपल्या आदेशाचा उल्लेख करत नवीन वाहनांसाठी दीर्घकालीन थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्याच्या निर्णयात सुधारणा केली आहे. नव्या आदेशानुसार नवीन कारसाठी चार वर्षांचा, तर नवीन दुचाकीसाठी सहा वर्षांचा थर्ड पार्टी विमा अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तातडीने जारी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Shiv Sena Symbol : ठाकरे गटासाठी उद्याचा दिवस निर्णायक? शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी कपिल सिब्बल मांडणार बाजू

Web Title: No fuel for vehicles without third party insurance supreme court orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 07:43 AM

Topics:  

  • Insurance Policy
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Gokul Dudh Sangh Election: अदृश्य शक्तींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ४९२ दूध संस्थांना मतदानाचा हक्क कायम
1

Gokul Dudh Sangh Election: अदृश्य शक्तींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ४९२ दूध संस्थांना मतदानाचा हक्क कायम

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
2

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
3

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.