नवी दिल्ली: एकीकडे तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची ‘कॅश फॉर क्वेरी’ (Cash For Query) प्रकरणात गेल्या शुक्रवारी त्यांची लोकसभेची खासदारकी रद्द करण्यात आली. आता महुआ मोईत्रा यांना घर रिकामे करण्याची नोटीसही देण्यात आली आहे. लोकसभेतून हकालपट्टी झाल्यानंतर आता त्यांना त्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
[read_also content=”पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पोलिस स्टेशनवर आत्मघातकी हल्ला, 6 पोलिसांचा मृत्यू; अनेक जखमी https://www.navarashtra.com/world/pakistan-big-suicide-attack-in-khyber-pakhtunkhwa-police-station-six-policemen-killed-many-injured-488274.html”]
याआधी महुआ मोइत्रा यांनी लोकसभेची खासदारकी रद्द करण्याच्या विरोधात गेल्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी महुआ मोइत्रा यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. तत्पूर्वी, लोकसभेच्या आचार समितीच्या अहवालावर चर्चा करून सभागृहातही तो मंजूर करण्यात आला होता, ज्यामध्ये मोईत्रा यांची हकालपट्टी करण्याची शिफारस करण्यात आली होती.
येथे, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की महुआ पुन्हा त्यांच्या नादिया मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवार असतील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर, मोईत्रा यांनी रविवारी कृष्णनगर मतदारसंघातील मतदार आणि पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या. यादरम्यान, एका व्हिडिओ संदेशात, मोईत्रा यांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील मतदारसंघातील सामान्य जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांचे आभार मानले आहेत.