Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Doval IIT Roorkee Speech:आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग

आमच्या पथकाला एकदा सीमावर्ती भागात एक गुप्तचर मोहीमेवर पाठवण्यात आले होते. योजनेनुसार, आमची टिम सुमारे पाच-सहा दिवसांनी परत येणार होती. पण पाच सहा दिवस ओलांडूनही टीम परतली नाही. टिम परत न आल्यामुळे आमची चिंता वाढू लागली. ही चिंता केवळ एक अधिकारी म्हणून नव्हती

  • By anuradha sagar
Updated On: Sep 19, 2026 | 05:01 PM
Ajit Doval, NSA Ajit Doval Speech, IIT Roorkee Convocation

Ajit Doval, NSA Ajit Doval Speech, IIT Roorkee Convocation

Follow Us
Follow Us:
  • आयआयटी रुरकीच्या दीक्षांत समारंभात NSA अजित डोवाल यांनी सांगितला सिक्कीममधील अनुभव
  • तरुण IPS अधिकारी असताना सिक्कीममध्ये IB प्रमुख म्हणून सांभाळली होती जबाबदारी
  • चिनी सैन्याच्या हालचाली टिपण्यासाठी पाठवलेली टीम ठरलेल्या वेळेत न परतल्याने वाढली होती चिंता
Ajit Doval IIT Roorkee Speech: गुप्तचर यंत्रणा म्हटली की तिच्या पडद्यामागील गूढ जगाबद्दल सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल असते. देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत गोपनीय पद्धतीने काम करणारे अधिकारी, संवेदनशील मोहिमा, देशविरोधी कारवायांचा मागोवा आणि शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवण्याची जबाबदारी या यंत्रणांवर असते. या गुप्तचर विश्वाचा उल्लेख झाला की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. भारतीय गुप्तचर व्यवस्थेत दीर्घकाळ काम केलेल्या डोवाल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

आयआयटी रुरकीच्या दीक्षांत समारंभात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या तरुणपणातील एक अनुभव शेअर केला आहे. “एक तरुण आयपीएस अधिकारी म्हणून सिक्कीममध्ये गुप्तचर विभागाचे प्रमुख असताना, त्यांच्या कर्तव्यांमध्ये सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवणे आणि चिनी सैन्याच्या (PLA) हालचालींची माहिती गोळा करणे यांचा समावेश होता.

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!

डोवाल म्हणाले की, त्यावेळी ते गुप्तचर कामात नवीन होते आणि खूप तरुण होते. सिक्कीममधील त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवणे, पीएलएच्या हालचाली समजून घेणे आणि चीनबद्दल महत्त्वपूर्ण माहिती गोळा करणे यांचा समावेश होता.

आमच्या पथकाला एकदा सीमावर्ती भागात एक गुप्तचर मोहीमेवर पाठवण्यात आले होते. योजनेनुसार, आमची टिम सुमारे पाच-सहा दिवसांनी परत येणार होती. पण पाच सहा दिवस ओलांडूनही टीम परतली नाही. टिम परत न आल्यामुळे आमची चिंता वाढू लागली. ही चिंता केवळ एक अधिकारी म्हणून नव्हती, तर मोहिमेवर गेलेल्यांच्या सुरक्षेबद्दलही होती. थोड्याच वेळात, आमच्या मुख्यालयातून फोन आला. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना कळवले की, सीमावर्ती भागात पाठवण्यात आलेल्या टिमला चीनी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. पण चीनसोबत अनेक वाटाघाटी, करार आणि बऱ्याच चर्चांचा बैठकांनंतर पथकाच्या सदस्यांना परत पाठवण्यात आले.

डोवाल यांना वाटले की त्यांची कारकीर्द संपली

डोवाल म्हणाले की, त्या घटनेनंतर माझी कारकीर्द संपली, असे मला वाटू लागले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली, परंतु चौकशीत त्यांची कोणतीही चूक आढळली नाही. पण त्या घटनेमुळे मी खूप दुःख झाले होतो. हा अनुभव माझ्यासाठी कठीण होता, कारण एक अधिकारी म्हणून माझ्यावर मोहिमेची जबाबदारी होती आणि दुसरीकडे, मोहिमेवरील लोकांच्या सुरक्षेचीही काळजी होती.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह

एका वृद्ध तिबेटी शेर्पाने दिलेला जीवनाचा धडा

डोवाल यांनी सांगितले की, त्यावेळी आमच्यासोबत गुप्तचर विभागात काम करणारे एक वृद्ध तिबेटी शेर्पा होते. या शेर्पाने त्यांना जीवनाबद्दल एक धडा शिकवला. ते म्हणाले की, हे सर्व नकाशा वाचण्यासारखे आहे. आयुष्यात काही लोक आपला नकाशा अचूक वाचतात, तर काही जण चुकीची दिशा निवडतात.या छोट्याशा घटनेने माझ्या जीवन आणि कारकिर्दीबद्दल एक महत्त्वपूर्ण धडा शिकवला. त्यांचा संदेश होता की, प्रत्येक व्यक्तीला अनेक परिस्थिती आणि मार्गांमधून निर्णय घ्यावे लागतात. प्रगतीसाठी योग्य दिशा ओळखणे आणि परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.

Web Title: Nsa ajit doval shares sikkim intelligence mission experience at iit roorkee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Ajit Doval
  • national news

संबंधित बातम्या

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!
1

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!

Rahul Gandhi On UPI Charges: UPI वर गुपचूप शुल्क लादण्याची तयारी; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!
2

Rahul Gandhi On UPI Charges: UPI वर गुपचूप शुल्क लादण्याची तयारी; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ
3

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.