Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oman Egg Import Ban : ओमानची अंडींवर आयातबंदी; तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये 6 कोटी अंडी अडकली, पोल्ट्री उद्योजक संकटात

Oman Egg Import Ban : बर्ड फ्लूच्या भीतीने ओमानने नमक्कलमधून अंडी आयात करण्यास बंदी घातली. त्यामुळे सहा कोटी अंडी अडकली असून, पोल्ट्री उद्योगाला विशेष अंडी निर्यात क्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 22, 2026 | 07:27 PM
Oman Egg Import Ban : बर्ड फ्ल्यूच्या भीतीनं ओमानची अंडीची आयातबंदी; तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये 6 कोटी अंडी अडकली, पोल्ट्री उद्योग

Oman Egg Import Ban : बर्ड फ्ल्यूच्या भीतीनं ओमानची अंडीची आयातबंदी; तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये 6 कोटी अंडी अडकली, पोल्ट्री उद्योग

Follow Us
Follow Us:
  • अंडी निर्यातीत नमक्कलचा 90 टक्के वाटा
  • अंडी निर्यात क्षेत्राची मागणी
  • अंडी विक्रीचा शेतकरी व व्यापाऱ्यांसमोर प्रश्न
 

Oman Egg Import Ban : आखाती देशातील ओमानने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतातील पोल्ट्री उद्योगाला त्याचा फटका बसणार आहे. ओमानला तामिळनाडूच्या नमक्कल येथून अंडी आयात करण्यात येत होती, मात्र बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर ओमानने भारतातील अंडींवर आयातबंदी लागू केली असल्याने येथील पोल्ट्री उद्योगाला त्याचा थेट फटका बसणार आहे.
नमक्कल येथे तब्बल 6 कोटी अंडी विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी नमक्कलमधील पोल्ट्री उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे या भागाला ‘विशेष अंडी निर्यात क्षेत्रा’चा दर्जा देण्याची मागणी केली आहे.

अंडी निर्यातीत नमक्कलचा 90 टक्के वाटा

तसं पाहता, पोल्ट्री उद्योग हा नमक्कलमधील प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन केले जाते. भारताच्या एकूण अंडी निर्यातीमध्ये नमक्कलचा वाटा हा तब्बल 90 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच या भागातून निर्यात होणाऱ्या अंड्यांपैकी जवळपास निम्मी अंडी ओमानला पाठवली जातात. त्यामुळे ओमानने आयातबंदी लागू केल्याने स्थानिक पोल्ट्री शेतकरी, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. ओमानमधील आयातदारांनाही या निर्णयाचा फटका बसत आहे.

नमक्कल लाइव्हस्टॉक अँड अॅग्रिकल्चरल फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्षांच्या मते, या परिसरातील पोल्ट्री फार्ममध्ये जैवसुरक्षेच्या कडक नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे अन्य भागांमध्ये बर्ड फ्लू आढळल्यास त्याचा परिणाम नमक्कलमधील अंडी निर्यातीवर होऊ नये असे आम्हाला वाटते. स्थानिक फार्ममधील सुरक्षेच्या उपाययोजनांचा विचार करून निर्यातीबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जावा, अशी ही संघटनेची मागणी आहे.

UP Assembly Election : यूपी निवडणुकीसाठी काँग्रेस-सपाची तयारी; 23 नोव्हेंबरपासून जागावाटपाची चर्चा

अंडी निर्यात क्षेत्राची मागणी

नमक्कलला स्वतंत्र ‘अंडी निर्यात क्षेत्र’ म्हणून मान्यता मिळाल्यास अन्य भागांतील रोगराईमुळे येथील व्यापारावर निर्बंध येण्याची शक्यता कमी होईल, असा संघटनेचा दावा आहे.

नमक्कल, सलेम, इरोड आणि कोयंबतूर या जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या पोल्ट्री पट्ट्यात एक हजारांहून अधिक पोल्ट्री फार्म आहेत. येथे सुमारे 8 कोटी कोंबड्यांचे संगोपन केले जाते. या फार्ममधून दररोज जवळपास 7 कोटी अंड्यांचे उत्पादन होते. सध्या विक्रीच्या प्रतीक्षेत असलेली 6 कोटी अंडी म्हणजे या संपूर्ण परिसराच्या एका दिवसाच्या उत्पादनाइतकी आहेत.

Road Accident News : रविवार ठरला मृत्यूचा काळ! विविध राज्यात झाले सहा भीषण अपघात, २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

या भागातून तमिळनाडू सरकारच्या पोषण कार्यक्रमांसह राज्यातील बाजारपेठांना अंड्यांचा पुरवठा केला जातो. तसेच देशातील अनेक राज्यांमध्येही अंडी पाठवली जातात. परदेशात ओमानव्यतिरिक्त सौदी अरेबिया, इराण, इराक, बहरीन, संयुक्त अरब अमिराती आणि काही आफ्रिकी देशांनाही अंड्यांची निर्यात होते.

मात्र, इतर सर्व परदेशी बाजारपेठांची मिळून जितकी मागणी आहे, जवळपास तितकीच मागणी एकट्या ओमानकडून येते. त्यामुळे ओमानची आयातबंदी उठेपर्यंत साठवलेल्या अंड्यांची विक्री कुठे करायची, हा मोठा प्रश्न शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओमानने नमक्कलमधून अंडी आयातीवर बंदी का घातली?

    Ans: बर्ड फ्लूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ओमानने नमक्कलमधून होणाऱ्या अंडी आयातीवर बंदी घातली आहे.

  • Que: ओमानच्या बंदीमुळे नमक्कलमध्ये किती अंडी अडकली आहेत?

    Ans: या बंदीमुळे सुमारे सहा कोटी अंडी विक्रीच्या प्रतीक्षेत अडकली आहेत.

  • Que: भारताच्या अंडी निर्यातीत नमक्कलचा किती वाटा आहे?

    Ans: भारताच्या एकूण अंडी निर्यातीमध्ये नमक्कलचा वाटा 90 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Oman egg import ban namakkal poultry industry six crore eggs stuck rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Egg
  • iran
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

Yuzvendra Chahal : टी-20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक विक्रम; 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय
1

Yuzvendra Chahal : टी-20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक विक्रम; 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.