India vs Pakistan War live in Marathi
८ मे रोजी पाकिस्तानने ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. पाकिस्तानी ड्रोनवर हवाई हल्ला करून भारताने त्यांचे मनसुबे पूर्णपणे उध्वस्त केले आहेत. ज्याचा व्हिडिओ भारतीय सैन्यानेच जारी केला आहे. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करत ५० हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडले आहेत. पाकिस्तानने भारतात ड्रोन पाठवण्याचा सतत प्रयत्न केला तेव्हा ही कारवाई सुरू करण्यात आली. तथापि, त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट सारख्या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे ड्रोन लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सनी पाडले आहेत.
OPERATION SINDOOR
Pakistan Armed Forces launched multiple attacks using drones and other munitions along entire Western Border on the intervening night of 08 and 09 May 2025. Pak troops also resorted to numerous cease fire violations (CFVs) along the Line of Control in Jammu and… pic.twitter.com/WTdg1ahIZp
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 9, 2025
09 May 2025 05:54 PM (IST)
पाकमधील एक रडार उद्धवस्त करण्यात यश आलं असून IMF च्या बैठकीत भारत हल्ल्याबाबत माहिती देणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
09 May 2025 05:51 PM (IST)
पाककडून तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर करण्यात आला असून पाककडून धार्मिक स्थळ ही लक्ष्य करण्यात आली होती.
09 May 2025 05:49 PM (IST)
पाकने भारताच्या दिशेने 300 ते 400 ड्रोन डागले, तसेच हवाई हद्द बंद न करताच पाकिस्तानकडून नागरी विमानाचं उड्डाण करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषद देण्यात आली.
09 May 2025 05:45 PM (IST)
पाकने भारताच्या 36 ठिकाणी हल्ले केले असून भारताकडून 4 ड्रोनच्या माध्यमातून प्रतिहल्ला करण्यात आला.
09 May 2025 05:42 PM (IST)
पाकचे सर्व हल्ले सैन्याने हाणून पाडले , अशी माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली.
09 May 2025 05:41 PM (IST)
पाककडूुन तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर करण्यात आला. तसेच पाकच्या गोळीबारात अनेक स्थानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
09 May 2025 05:39 PM (IST)
पाकने वापरलेले ड्रोन तुर्कस्तानचे असल्याची माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली.
09 May 2025 05:37 PM (IST)
पाकिस्तानने काल भारताची वायूहद्द ओलांडली, पाकिस्तानचा 300 ते 400 ड्रोनची हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
09 May 2025 05:35 PM (IST)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देण्यात आला.
09 May 2025 05:18 PM (IST)
भारत पाकिस्तान युद्ध सुरु असताना मुंबईसह महाराष्ट्रामधील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
Happening now :
CM Devendra Fadnavis chairs a meeting at his official residence ‘Varsha’ in Mumbai, on ‘Security measures’ in the wake of current situation, with the DGP, top Home Dept officials and other senior officers of various agencies and departments.
DCM Eknath Shinde too… pic.twitter.com/SjybjaMTS9— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 9, 2025
09 May 2025 04:57 PM (IST)
भारतीय परराष्ट्र मंत्रालय लवकरच ऑपरेशन सिंदूरवर पत्रकार परिषद घेणार आहे. या काळात, परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानच्या हल्ल्याच्या प्रयत्नाची आणि त्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराशी संबंधित माहिती देईल.
09 May 2025 03:48 PM (IST)
एकीकडे, पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडताना भारताने त्याला चांगलाच फटकारले आहे आणि अवघ्या ४८ तासांत त्याला गुडघे टेकायला लावले आहे. त्याच वेळी, आज आयएमएफच्या बैठकीत गरीब पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे आणि भारत-पाक संघर्षाचा परिणाम यामध्ये दिसून येतो.
09 May 2025 02:38 PM (IST)
८-९ मे च्या रात्री, बीएसएफने जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरून (आयबी) घुसखोरी करणाऱ्या सात दहशतवाद्यांना ठार मारले. याशिवाय, पाकिस्तानी चौकी धंधारचेही नुकसान झाले आहे.
09 May 2025 01:00 PM (IST)
भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाल्यामुळे जम्मू-काश्मीर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतीय नागरिकांवर हल्ला केला. पूंछमध्ये झालेल्या पाकिस्तानी गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना भेटण्यासाठी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सरकारी रुग्णालयला भेट दिली आहे.
#WATCH | J&K CM Omar Abdullah reaches the govt hospital in Jammu to meet the people who were injured in the Pakistan shelling that took place in Poonch pic.twitter.com/GXR3HUylWn
— ANI (@ANI) May 9, 2025
09 May 2025 12:57 PM (IST)
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर BCCI ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेला आयपीएलचा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.
🚨 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🚨
IPL 2025 is suspended until further notice.
New dates & venues are being reviewed — remaining matches may be rescheduled soon.
Nation First. Safety Always. 🇮🇳#IPL2025 | #IPl | #IndiaPakistanWar pic.twitter.com/3pprpXNZ2p
— Indian Cricket Team (@incricketteam) May 9, 2025
09 May 2025 12:28 PM (IST)
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे, त्यामुळे देशातील अनेक राज्ये हाय अलर्टवर आहेत. भारत सरकारकडून ऑपरेशन सिंदूर राबवले जात आहे. दिल्ली सरकारने गुरुवारी पुढील आदेश येईपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, आज दिल्ली आणि इतर सीमावर्ती राज्यांमध्ये सर्व काही बंद आहे. सेवा विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची तयारी लक्षात घेता, दिल्ली सरकारने सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
09 May 2025 11:51 AM (IST)
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तानमधून करण्यात आलेल्या स्ट्राइकनंतर भारत सरकारने संपूर्ण देशात सुरक्षा वाढवली आहे. सरकारने प्रत्येक नागरिकाला अलर्ट राहण्याचा सूचना दिल्या आहेत. याशिवाय भारताने देशातील टेलिकॉम कंपन्यासाठी देखील महत्त्वाचे अलर्ट जारी केले आहेत. ज्यामध्ये देशातील खाजगी आणि सरकारी टेलिकॉम कंपन्यांना कठीण परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशात इमरजेंसी परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्र सरकारने सर्व खाजगी आणि सरकारी टेलिकॉम ऑपरेटर्सना नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.
09 May 2025 11:36 AM (IST)
भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बैठक बोलवली आहे. त्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबच बैठक ठेवली आहे. सध्याच्या परिस्थितीवर त्यांची सैन्यदलाच्या प्रमुखांशी चर्चा होणार आहे.
09 May 2025 11:34 AM (IST)
राजस्थानमधील जैसलमेरमध्ये एक संशयास्पद बॉम्ब आढळला आहे. बॉम्बची माहिती मिळताच पोलिस आणि लष्कराचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. किशनगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकांची हालचाल थांबवण्यात आली आहे. तर हरियाणातील पंचकुला येथे सायरन वाजला आहे. सर्व लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, काल रात्री अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले.
09 May 2025 11:26 AM (IST)
सांबा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या या दहशतवाद्यांना बीएसएफने ठार मारले आहे. बीएसएफच्या कारवाईत सात दहशतवादी ठार झाले आहेत.
09 May 2025 11:25 AM (IST)
वर्ल्ड बॅंक ग्रुपचे प्रेसिडेंट अजय बंगा हे भारतामध्ये आले आहेत. त्यांचे लखनौ विमानतळावर आगमन झाले आहे.
#WATCH | Uttar Pradesh | President of the World Bank Group, Ajay Banga, arrives at the Lucknow airport. pic.twitter.com/lUxbrOIs8v
— ANI (@ANI) May 9, 2025
09 May 2025 11:22 AM (IST)
पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे 'एक्स' खाते हॅक करण्यात आले आहे. यावरुन खोटे दावे केले जात असल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे.
Pakistan's Ministry of Information and Broadcasting claims that the 'X' account of the govt's Ministry of Economic Affairs, Economic Affairs Division was hacked https://t.co/SQbnZ8QJjj pic.twitter.com/wwBpynQhR7
— ANI (@ANI) May 9, 2025
09 May 2025 11:07 AM (IST)
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या या युद्धादरम्यान आता सायबर अटॅकची मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान भारतीय नागरिकांना टार्गेट करून त्यांना वेगवेगळ्या फाईल्स पाठवत आहे. या फाईल्स जर ओपन केल्या तर स्मार्टफोन हॅक होऊ शकतो आणि संपूर्ण माहिती पाकिस्तानच्या हॅकर्सकडे जाऊ शकते. भारतीय नागरिकांच्या WhatsApp, Email व अन्य सोशल मीडिया अकाऊंटवर ‘Dance of the Hillary’ नावाने एक लिंक आणि फाईल शेअर केली जात आहे, ज्यामध्ये व्हायरस आहे. हा व्हायरस स्मार्टफोनमधील सर्व माहिती आपल्या शत्रू राष्ट्रापर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने सावध राहणं गरजेचं आहे. संपूर्ण बातमी वाचा
09 May 2025 11:03 AM (IST)
पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजे झुंडीने ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये 50 पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले. भारतीय वायूदलाने काल रात्रभर लाहोर, इस्लामाबाद यासह प्रमुख शहरांवर द्रोण हल्ले करून अनेक भाग बेचिराख केले होते. तरीही पाकिस्तानची मस्ती काही जिरली नाही आहे. आता पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी भारतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला आहे. पंजाबच्या चंदिगढ परिसरात पाकिस्तानी सैन्याचे पाच ड्रोन शिरले आहेत. त्यापूर्वी चंदीगढमध्ये सायरन वाजतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. चंदीगढमध्ये आतापर्यंत पाच ड्रोन शिरल्याची माहिती समोर आली आहे.सविस्तर बातमी....
09 May 2025 10:40 AM (IST)
भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. यामध्ये सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री सध्याच्या परिस्थितीबाबत बैठक घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
09 May 2025 10:36 AM (IST)
एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी पाकिस्तान हा विश्वासघातकी असल्याने त्याविषयी सुद्धा खबरदारी घेण्याचे सूतोवाच केले आहे. “आपल्या सर्वांना वाटत आहे की, पाकिस्तान गुडघ्यावर आला आहे. पण असे नाही. कोणत्याही भ्रमात राहू नका. अमेरिकेने हाफिज सईद याच्या मुलाला दहशतवादी घोषित केले आहे. पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी मारल्या गेले. त्यांच्या अंत्यविधी यात्रेत- नमाजे जनाजा मध्ये सईदचा मुलगा आला." सविस्तर बातमी....
“हाच पाकिस्तानचा खरा चेहरा”, ऑपरेशन सिंदूरनंतर असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?
09 May 2025 10:01 AM (IST)
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या या युद्धादरम्यान सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. कधी हे दावे भारताच्या बाजूने आहेत तर कधी हे दावे पाकिस्तानच्या बाजूने आहेत. सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांना भडकण्यासाठी अनेक खोट्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. याच सर्व घटना लक्षात घेऊन आता सोशल मीडिया युजर्ससाठी सरकारने एक अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या पोस्टवर विश्वास ठेऊ नका. शिवाय भारतीय नागरिकांमधील तणाव वाढेल अशी कोणत्याही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नका.
In the coming days your social media will be flooded with #Pakistan sponsored propaganda.
It's crucial to scrutinize every piece of information carefully.
If you encounter dubious content, especially concerning the Indian Armed Forces or any info related to ongoing situation,… pic.twitter.com/YomXZUKmpH
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 8, 2025
09 May 2025 10:01 AM (IST)
भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान आता भारताच्या आयएनएस विक्रांतची (INS Vikrant) एन्ट्री झाली आहे. भारताने समुद्रामार्गे पाकिस्तानवर आणखी एक मोठा घाव घातला. आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. INS Vikrant (IAC-1) या भारतातच बनवलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेने कराची बंदरावर तुफानी हल्ले चढवले. कराची बंदरावर 14 पेक्षा अधिक स्फोट झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं सांगितलं जात आहे. नौदलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानने बंदर परिसरातही ब्लॅकआउट जाहीर केला. सविस्तर बातमी....
इस्लामाबाद ते कराची हादरले! भारताच्या INS विक्रांतची धमाकेदार एन्ट्री, पाकची हवा टाइट
09 May 2025 09:59 AM (IST)
पाकिस्तानकडून सुरु असलेल्या युद्धजन्य कारवायांना प्रत्युत्तर देताना भारताने गुरुवारी मोठी कारवाई केली. भारतीय सैन्याने लाहोर, सियालकोटसह पाकिस्तानातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले असून, या हल्ल्यांमध्ये लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे नष्ट झाल्याचे सूत्रांकडून समजते.
हवाई कारवाईसह भारताने समुद्रमार्गानेही पाकिस्तानवर हल्ला चढवला. भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेने कराची बंदरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात कराची बंदराचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून, बंदर पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
09 May 2025 09:58 AM (IST)
भारत-पाकिस्तानच्या युद्धाची ठिणगी आता देशातच नाही तर जगभर पसरू लागली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर आता परिस्थिती आणखीन बिकट होणार असल्याचा अंदाजा लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, आता सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MFA) दिनांक 7 मे रोजी आपली एक नवीन ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे. यात, दक्षिण आशियातील काही भागांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. हा इशारा प्रामुख्याने सुरक्षेच्या वाढत्या धोक्यांमुळे देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा संपूर्ण बातमी
09 May 2025 09:54 AM (IST)
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षाही वाढवण्यात आली.
09 May 2025 09:38 AM (IST)
चंदीगडमध्ये ड्रोन हल्ल्याचा सायरन वाजला आहे. हवाई दलाच्या तळाने इशारा जारी केला आहे. पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सायरन वाजवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
09 May 2025 09:25 AM (IST)
जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथील चिनाब नदीवरील बगलीहार जलविद्युत प्रकल्प धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.
#WATCH | Jammu and Kashmir | A gate at the Baglihar Hydroelectric Power Project Dam built on the Chenab River in Ramban has been opened.
(Visuals from the spot shot around 8:15 am) pic.twitter.com/wDsQQqnOzf
— ANI (@ANI) May 9, 2025