Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smriti Irani Gas Protest : LPG चा तुटवडा अन् स्मृती इराणींविरुद्ध Viral झाले मीम्स; लापता लेडीज अन्…

गॅसच्या किंमती वाढल्यामुळे स्मृती इराणी यांनी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जोरदार आंदोलन केले होते. यावरुन आता गॅस तुटवड्यावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 13, 2026 | 05:43 PM
Opposition Criticizes Smriti Irani Over LPG Cylinder Shortage Political News

Opposition Criticizes Smriti Irani Over LPG Cylinder Shortage Political News

Follow Us
Follow Us:

Smriti Irani Gas Protest : नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावर जाणवू लागला आहे. महाराष्ट्रसह विविध राज्यांमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा (LPG Gas) भासत असून यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळणे बंद झाले असून घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काळाबाजार वाढला असून सामान्य जनतेचे हाल होत आहेत. यामुळे केंद्र आणि राज्यातील विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले. तसेच मोदी सरकारमधील माजी मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना देखील या वादामध्ये पुन्हा घेरण्यात आले आहे.

 

 

गॅसच्या किंमती वाढल्यामुळे स्मृती इराणी यांनी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जोरदार आंदोलन केले होते. जेव्हा गॅसचे दर ₹४००-५०० च्या आसपास होते, तेव्हा स्मृती इराणी आणि भाजप नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. सिलेंडरच्या किंमती 50 रुपयांनी वाढल्याने त्यांनी जोरदार आंदोलन केले होते. भाजपच्या या आंदोलनाचे नेतृत्व स्मृती इराणी यांनी केले होते. तसेच त्या रस्त्यावर गॅस सिलेंडर घेऊन ठिय्या आंदोलन केले. यानंतर आता युद्धाच्या परिस्थितीमुळे देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरुन टीका करताना विरोधकांनी पुन्हा स्मृती इराणींना लक्ष्य केले.

हे देखील वाचा : अजित पवार अपघात की घातपात? ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये छेडछाड होत असल्याचा रोहित पवारांचा खळबळजनक दावा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गॅसच्या तुटवड्यावर सोशल मीडिया पोस्ट केली. यामध्ये त्यांनी माजी मंत्री स्मृती इराणी यांचा AI (कृत्रीम बुद्धीमत्ता) वापरुन तयार केलेला फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये स्मृती इराणी यांना उद्देशून लापता लेडीज असा टोला लगावला आहे. काँग्रेस काळातील आंदोलनाची आठवण करुन देत हा टोला लगावण्यात आला आहे.
याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेसने देखील व्हिडिओ शेअर करुन स्मृती इराणींवर निशाणा साधला. कुठे हरवल्या स्मृती इराणी? सिलेंडर तुम्हाला बोलावतोय, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मंत्री स्मृती इराणी डोक्यावर सिलेंडर घेऊन पळत असल्याचे व्यंगात्मक चित्र रेखाटण्यात आले आहे.

pic.twitter.com/WcdjyKB0xD — Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2026

हे देखील वाचा : संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांची ‘चायपार्टी’! राहुल गांधींवर भाजपने साधला निशाणा

विरोधकांची संसदेच्या पायऱ्यांवर चहा-पार्टी

देशामध्ये युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने विरोधकांनी संसदेच्या आवारामध्ये चूल मांडली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकरावर टीका करण्यात आली. तसेच हे परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचे देखील विरोधकांनी म्हटले आहे. यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये विरोधकांनी केलेल्या आंदोलनामध्ये गॅस तुटवड्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. मात्र यावेळी संसदेच्या आवारात राहुल गांधींसह इतर विरोधी खासदारांनी चहा-बिस्किट खाल्ले. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

Web Title: Opposition criticizes smriti irani over lpg cylinder shortage political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • LPG Gas
  • LPG gas cylinder
  • Smriti Irani

संबंधित बातम्या

महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल
1

महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.