Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात की घातपात? 'ब्लॅक बॉक्स'मध्ये छेडछाड होत असल्याचा रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजित पवार यांच्या विमान अपघातावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. अजित पवार यांचा विमानाचा अपघात झाला नसून तो घातपात असल्याचा आरोप रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे. रोहित पवार यांनी, या घातपाताच्या कटात व्हीएसआर कंपनी आणि काही राजकीय नेतेही सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता. इतकेच नव्हे तर सीआयडी कडूनही या अपघाताचा योग्यप्रकारे तपास केला जात नसल्याचे आरोप त्यांनी केला आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आता पुन्हा एकदा या अपघातासंदर्भात खळबळजनक दावे केला आहेत. VSR कंपनीच्या ज्या कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी अपघाती विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. ब्लॅकबॉक्समधील संवेदनशील माहिती एडीट केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी ट्विटर एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून त्यांनी याबाबत आरोप केला.
एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, “फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: भाजपचे अनिल मकरिये स्थायी समिती सभापतीपदी विजयी;
DGCA किंवा AAIB मधील जे कुणी याकामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी forensic audit मध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी. उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर (जी होणारच आहे) आणि त्यात forensic audit झाले जे होणारच आहे तेंव्हा VSR कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाही. तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत हेही लक्षात असू द्यावं..
दरम्यान , गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, आणि हा मुद्दा संसदेतही उठवला जावा,यासाठी ते दिल्लीत मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आत्तापर्यंत रोहित पवारांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, माजी खासदार संजय सिंह यांची भेट घेतली. येत्या सोमवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन ते याबाबत महत्त्वाचा खुलासा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.






