pakistani soldiers arrested by indian army BSF on rajasthan border
नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे भारताकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या जवानाला ताब्यात घेतले आहे. बीएसएफने राजस्थानच्या सीमेवर पाकिस्तानी जवानाला ताब्यात घेतले आहे. या जवानाचे सीमा पार करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.
पाकिस्तानी जवान राजस्थानच्या भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय सेनेने त्याला रोखले आणि ताब्यात घेतले आहे. या पाकिस्तानी जवानाचा घुसखोरी करण्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. शनिवारी (दि.03) रात्री या जवानाला ताब्यात घेतले आहे. भारत आणि पाकिस्तान देशाच्या सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती झाली आहे. त्यामुळे भारतीय सेना डोळ्यात तेल घालून बारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. सीमाभागांतील सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली. पाकिस्तानच्या या जवानाची सध्या चौकशी सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
23 एप्रिल रोजी, पाकिस्तानी सेनेने भारतीय जवानाला ताब्यात घेतले. याचे दोन छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली, त्यापैकी एकात त्यांनी एका सैनिकाला धरले होते आणि दुसऱ्या फोटोत सैनिकाच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. हे सैनिक भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) पूर्णम साहू होते. पूर्णम हे बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रिसदा गावचे रहिवासी आहे. ते गेल्या 17 वर्षांपासून बीएसएफमध्ये कार्यरत आहे आणि सध्या ते पंजाबमधील फिरोजपूरजवळील भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात होते. भारत-पाकिस्तान सीमेवर अनेक ठिकाणी सीमेपलीकडे शेतकऱ्यांची शेते आहेत. या शेतांमध्ये सैनिक शेतकऱ्यांचे संरक्षक म्हणून काम करतात. फिरोजपूरच्या अशाच एका सीमेवर गव्हाची कापणी सुरू आहे, जिथे शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी पूर्णम तैनात होते. या बाबतीत बीएसएफ जवानाने केलेली चूक अशी होती की, सीमेवरील कुंपणावरील गेट क्रमांक 2008/01 वर शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करत असताना, त्याने चुकून सीमा ओलांडली आणि त्याची तब्येतही थोडी कमकुवत असल्याने ते तिथे असलेल्या एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी बसले आणि दुर्दैवाने ते झोपी गेले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाक रेंजर्सनी पूर्णम साहू यांना अटक केली आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाडाखाली झोपण्याची वारंवार विनंती करून सांगूनही पाकिस्तानी सीमा रक्षकांनी साहू यांना सोडले नाही. दरम्यान, बीएसएफचे अनेक वरिष्ठ अधिकारीही आले, परंतु पाकिस्तानने कोणताही सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला नाही आणि त्यांनी पूर्णवला पळवून नेले. यानंतर, पाकिस्तानी रेंजर्ससोबत बीएसएफच्या तीन उच्चस्तरीय प्रमुख बैठका झाल्या आहेत, परंतु बीएसएफ जवानाच्या सुटकेबाबत कोणतीही सकारात्मक माहिती मिळालेली नाही.