
Rahul Gandhi Girlfriend Mention, Rahul Gandhi Cambridge Restaurant Story
Rahul Gandhi Girlfriend News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विवाहाचा विषय हा संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा विषय आहे. त्यांच्या वैयक्तिय आयुष्याबद्दल जाणून घेण्याचीही अनेकांच्या मनात इच्छा असते. पण आपल्या राजकीय भाषणांतून आक्रमक भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पहिल्यांदाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक किस्सा सांगितला. त्यांच्या या आठवणींनी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे आपल्या प्रेयसीचा उल्लेख केला आणि आपल्या केंब्रिजमधील दिवसांची एक आठवण सांगितली.
राहुल गांधी म्हणाले की, लहानपणापासून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या पहिल्या भेटीची गोष्ट अनेक वेळा ऐकली होती. अनेक वर्षांनंतर, जेव्हा ते स्वतः पुढील शिक्षणासाठी केंब्रिजला गेले, तेव्हा त्यांनी आपल्या प्रेयसीला त्या ऐतिहासिक रेस्टॉरंटमध्ये सोबत येण्यास सांगितले, जिथे त्यांच्या आई-वडिलांची पहिली भेट झाली होती.
BJP Politics राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे काय आहे भाजपचे संसदीय गणित !
त्या घटनेची आठवण सांगताना राहुल गांधीं म्हणाले की, रेस्टॉरंटचा दरवाजा पिवळा होता. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि कर्मचाऱ्याने विचारले की किती लोक आहेत, तेव्हा त्याने उत्तर दिले, “दोन.” आत गेल्यावर त्यांनी मेन्यू पाहिला आणि जेवण मागवले. राहुलच्या म्हणण्यानुसार, रेस्टॉरंटमधील वेटरने राजीव आणि सोनिया गांधी यांच्या पूर्वीच्या भेटींच्या आठवणीही सांगितल्या. आम्ही तीच चिकन डिश मागवली जी राजीव गांधी आणि सोनिया गांधी नेहमी खायचे.
कार्यक्रमादरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, त्यांनी राजीव आणि सोनिया गांधी यांना घरी नेहमी एकमेकांच्या खूप जवळ पाहिले. वडील राजीव गांधी जेव्हा घरी असायचे त्यावेळी आई त्यांच्या मांडीवर बसायची; त्यांच्यासाठी हीच आई-वडिलांच्या प्रेमाची व्याख्या होती. लहानपणी जेव्हा ते मित्रांच्या घरी जायचे आणि तिथे त्यांना मित्रांचे आई-वडील असे एकत्र दिसत नसत, तेव्हा ते आश्चर्याने त्यांना विचारायचे की त्यांचे आई-वडील असे का राहत नाहीत.
Maharashtra Politics : राज्यात लवकरच ‘ऑपरेशन टायगर-3’ होणार? महायुतीतील मंत्र्याने केले सूचक विधान
एका प्रेमकथेची सुरुवात १९६५ मध्ये केंब्रिजमधील एका रेस्टॉरंटमध्ये झाली. सोनिया गांधी यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात राजीव गांधी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचे तपशीलवार वर्णन केले आहे. पुस्तकानुसार, त्यांची पहिली भेट १९६५ मध्ये केंब्रिजमधील ‘व्हर्सिटी रेस्टॉरंट’ या छोट्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये झाली, जिथे भारत आणि युरोपमधील विद्यार्थी अनेकदा जेवायला जात असत.
सोनिया इंग्लंडमध्ये तिच्या इटालियन चवीला साजेसे असलणाऱ्या जेवणाच्या शोधात असताना त्या या रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या, त्याच रेस्टॉरंटमध्ये एका ओळखीच्या मित्राने तिची ओळख राजीव गांधींशी करून दिली. त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच त्यांना राजीव गांधींच्या शांत आणि सौम्य स्वभावाशी एक अतूट नाते जाणवले. त्यांची मैत्री वाढत गेली, ते एकत्र वेळ घालवू लागले आणि अखेरीस, २५ फेब्रुवारी १९६८ रोजी ते विवाहबंधनात अडकले.