Operation Sindoor: "पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या चुका..."; 'ऑपरेशन सिंदूर'वरून जयशंकर यांनी काढले काँग्रेसचे वाभाडे
१. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर भाष्य
२. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवले होते ऑपरेशन सिंदूर.
३. पाकिस्तानमध्ये घुसून हवाई दलाने १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारले होते.
नवी दिल्ली/S. Jaishankar Operation Sindoor in Rajysabha: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. यावेळी त्यांनी दहशतवादी आणि पहलगाम हल्ल्याबाबत देखील भाष्य केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कशा प्रकारे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी भारताने कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवले याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी जयराम रमेश यांना सुनावले. यावेळी पंतप्रधान मोदींनी नेहरूंची चूक सुधारली असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.
ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “६० वर्षे म्हटले जात होते की, नेहरूंच्या चुका सुधारल्या जाऊ शकत नाही. मात्र मोदी सरकारने (Pm Narendra Modi)कलम ३७० हटवून आणि आता सिंधू जल करार स्थगित करून चुका सुधारल्या जाऊ शकतात हे दाखवून दिले. जोवर पाकिस्तान दहशतवादाला सोडत नाही तोवर सिंधू जल करार स्थगितच राहणार आहे.”
Operation Sindoor: “कान उघडे ठेवून ऐका…”; राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं
पुढे बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar)म्हणाले, “टीआरएफ लष्कर ए तोयबाचे संघटन आहे. भारताने हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिले आहे. संयुक्त राष्ट्राने हे मान्य केले आणि अमेरिकेने टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हा भारत विजय आहे. रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही. पहलगाममध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर पूर्ण केले. भारताने अणुहल्ल्याच्या धमकीला देखील भीक घातली नाही.” एस. जयशंकर यांनी २००६ – २००८ मधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. ज्यामध्ये मुंबई ट्रेन ब्लास्ट, हैदराबाद आणि जयपूर मधील हल्ले यांचा देखील उल्लेख केला.
परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं
राज्यसभेत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “जयराम रमेशजी नीट कान देऊन एका, २२ एप्रिल ते १६ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झालेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक आक्रमक निर्णय घेतले. धोरणात्मक निर्णय घेतले. सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला थेंब-थेंब पाण्यासाठी तड्फडवण्यात आले. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रोखण्यात आला. सीमा बंद करण्यात आल्या.”