
PM Modi visits Lucknow on Atal Bihari Vajpayee Jayanti Rashtra Prerna Sthal built on 65 acres of land dedicated to the nation
Rashtra Prerana Sthal Lucknow inauguration 2025 : भारतीय राजकारणातील ‘अजातशत्रू’ व्यक्तिमत्व, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee Jayanti) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ एका ऐतिहासिक सुवर्णक्षराची साक्षीदार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज लखनौमधील वसंत कुंज येथे ६५ एकरच्या विस्तीर्ण भूखंडावर उभारलेल्या भव्य ‘राष्ट्र प्रेरणा स्थळ’ चे उद्घाटन करणार आहेत. हे केवळ एक स्मारक नसून, भारतीय राष्ट्रवादाच्या तीन महान स्तंभांच्या विचारांना उजाळा देणारे एक शक्तीपीठ ठरणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारने सुमारे २३० कोटी रुपये खर्च करून हे भव्य संकुल विकसित केले आहे. भारतीय राजकारणाला नवी दिशा देणारे तीन दिग्गज नेते – डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि स्वतः अटल बिहारी वाजपेयी – यांच्या स्मृतींना हे स्थळ समर्पित आहे. ६५ एकरमध्ये पसरलेले हे संकुल भावी पिढीला राष्ट्रवादाची आणि त्यागाची प्रेरणा देण्यासाठी सज्ज झाले आहे. या स्मारकाच्या माध्यमातून या महापुरुषांचे विचार जगासमोर नेण्याचा सरकारचा मानस आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Christmas 2025: केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजला खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल रंगाचा ड्रेस
या प्रेरणा स्थळाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे या तिन्ही नेत्यांचे उभारलेले ६५ फूट उंच भव्य कांस्य पुतळे. हे पुतळे राष्ट्र उभारणीतील त्यांच्या अढळ योगदानाचे प्रतीक आहेत. याशिवाय, संकुलात कमळाच्या आकाराचे एक अत्याधुनिक संग्रहालय बांधण्यात आले आहे. या संग्रहालयात डिजिटल माध्यमातून पर्यटकांना या महापुरुषांच्या जीवनप्रवासाची, त्यांच्या संघर्षाची आणि भारतासाठी पाहिलेल्या स्वप्नांची माहिती घेता येईल. यासोबतच येथे एक मोठे ध्यान केंद्र आणि अडीच लाख लोक बसू शकतील असे सार्वजनिक मैदानही विकसित करण्यात आले आहे.
🚨PM Modi to inaugurate 65-acre, Rs 232 crore ‘Rashtra Prerna Sthal’ in Lucknow tomorrow. It features 65-feet bronze Statues of S.P Mukherjee,Atal Bihari,Upadhyay and 2-storey museum. pic.twitter.com/cvhKaAYsCb — Indian Infra Report (@Indianinfoguide) December 24, 2025
credit : social media and Twitter
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी १:५० वाजता लखनौच्या अमौसी विमानतळावर दाखल होतील. तेथून ते थेट हेलिकॉप्टरने वसंत कुंज येथील प्रेरणा स्थळावर पोहोचतील. दुपारी २:३० वाजता त्यांच्या हस्ते या भव्य स्मारकाचे अनावरण होईल. या सोहळ्यासाठी सुमारे २,५०,००० लोकांची उपस्थिती असणार असून, पंतप्रधान एका विशाल जनसभेला संबोधित करतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
देश की महान विभूतियों की विरासत के सम्मान और संरक्षण के लिए हमारी सरकार कृतसंकल्प है। इसी कड़ी में कल दोपहर बाद करीब 2:30 बजे लखनऊ में पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी की 101वीं जयंती के अवसर पर ‘राष्ट्र प्रेरणा स्थल’ के उद्घाटन का सौभाग्य मिलेगा। यहां… pic.twitter.com/ssmmeQORxF — Narendra Modi (@narendramodi) December 24, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उद्घाटनापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत आपले भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, “देशातील महान व्यक्तिमत्त्वांचा वारसा जपणे आणि त्यांचा सन्मान करणे हे आमचे सौभाग्य आहे.” लखनौमध्ये या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, संपूर्ण शहर ‘अटलमय’ झाले आहे. हे प्रेरणा स्थळ केवळ पर्यटनाचे ठिकाण नसून ते भारतीय मूल्यांचे आणि राष्ट्रीय अस्मितेचे केंद्र म्हणून ओळखले जाईल.
Ans: या स्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर २०२५ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त केले.
Ans: येथे अटलबिहारी वाजपेयी, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे ६५ फूट उंच भव्य पुतळे बसवण्यात आले आहेत.
Ans: हा प्रकल्प ६५ एकर जागेवर पसरलेला असून तो सुमारे २३० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे.