Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीमध्ये ‘OBC कार्ड’ ठरणार गेमचेंजर? PM मोदींनी स्वतःसह केला नितीश कुमार यांचा उल्लेख

बिहार निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दौरा केला. यावेळी मोदींनी समस्तीपूर येथे पहिली प्रचार सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केला.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 24, 2025 | 02:22 PM
PM Narendra Modi bihar visit samastipur speech live obc reservation bihar elections 2025

PM Narendra Modi bihar visit samastipur speech live obc reservation bihar elections 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दौरा केला.
  • PM नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये समस्तीपूर येथून प्रचाराला सुरुवात केली
  • प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी OBC समाजाचा आवर्जुन उल्लेख केला

Bihar Elections 2025: बिहार : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची (Bihar elections) रणधुमाळी सुरु आहे. जोरदार प्रचार सुरु असून राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बिहारच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी हे आज (दि.24) बिहारच्या दौऱ्यावर असून समस्तीपूरमध्ये त्यांनी पहिली प्रचारसभा घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) पहिल्याच प्रचारसभेमध्ये ओबीसी समाजाचा उल्लेख करत जातीय राजकारणाला हात घातला.

बिहारमध्ये निवडणूका आणि मुख्यमंत्रीपद हे जातीय समीकरणावर आधारित असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये याचा आवर्जुन उल्लेख केल्याचे आढळून येते. समस्तीपूर येथील सभेमध्ये पंतप्रधान मोदी खास पगडीमध्ये दिसून आले. तसेच भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ओबीसी असल्याचा उल्लेख केला. त्यांनी स्वतःला तसेच नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांचा उल्लेख इतर मागासवर्गीय असा केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांना कर्पुरी गावात आदरांजली वाहण्याची संधी मला मिळाली. माझ्यासारखे, नितीश कुमार आणि रामनाथ ठाकूर सारखे मागास आणि गरीब कुटुंबातून आलेले लोक आज व्यासपीठावर उभे आहेत हे त्यांचे आशीर्वाद आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात सामाजिक न्याय आणण्यात आणि गरीब आणि उपेक्षितांना नवीन संधींशी जोडण्यात जननायक कर्पुरी ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते भारतमातेचे एक मौल्यवान रत्न होते. त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा मान आमच्या सरकारला मिळाला. हा आमच्यासाठी सन्मान आहे. आमचे सरकार भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांना प्रेरणास्त्रोत मानते. आम्ही या संकल्पाने पुढे गेलो आहोत: वंचितांना प्राधान्य देणे, मागासांना प्राधान्य देणे आणि गरिबांची सेवा करणे.” असा उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये केला.

ही गरिबांची सेवा आहे की नाही?

गरिबांना कायमस्वरूपी घर देणे ही गरिबांची सेवा आहे की नाही असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थितांना विचारला. “गरिबांना मोफत अन्नधान्य देणे ही गरिबांची सेवा आहे की नाही? एनडीए सरकार मोफत वैद्यकीय उपचार, शौचालये, नळाचे पाणी आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक सुविधा पुरवत आहे. भाजप-एनडीएने कर्पूरी बाबूंनी दाखवलेल्या सामाजिक न्यायाच्या मार्गाला सुशासनाचा आधार बनवले आहे. आम्ही गरीब, दलित, महादलित, मागास आणि अति मागासवर्गीयांच्या हितांना प्राधान्य दिले आहे. आमच्या सरकारनेच सामान्य वर्गातील गरिबांनाही १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे,” असा देखील दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

बिहार इलेक्शनच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

कॉंग्रेस काय करतं तुम्हाला माहिती…

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, “भाजप सरकारनेच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण आणखी १० वर्षांसाठी वाढवले ​​आहे. पूर्वी, वैद्यकीय शिक्षणासाठी अखिल भारतीय कोट्यात मागास आणि गरिबांना आरक्षण दिले जात नव्हते. संविधानाने लोकांना दिशाभूल करणाऱ्यांच्या राजवटीत हे फायदे नाकारले जात होते; एनडीए सरकारने ही तरतूद केली. ओबीसी आयोगाला संवैधानिक संस्था बनवण्याची मागणी अनेक दशकांपासून सुरू होती आणि एनडीए सरकारने ही मागणी पूर्ण केली. कर्पूरी बाबू हे मातृभाषेत शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. एनडीए सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेत शिक्षणावर भर दिला आहे. आता, गरीब आणि वंचितांची मुले देखील त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण घेऊ शकतात आणि परीक्षा देऊ शकतात. दुसरीकडे, आरजेडी आणि काँग्रेस काय म्हणत आहेत आणि करत आहेत हे तुम्हाला आमच्यापेक्षा चांगले माहिती आहे,” असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या बिहारमधील भाषणामध्ये विरोधकांना लगावला.

Web Title: Pm narendra modi bihar visit samastipur speech live obc reservation bihar elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • PM Narendra Modi
  • political news

संबंधित बातम्या

एका कंत्राटदाराने सत्ताधारी 21 आमदारांना दिली 25 कोटींची डिफेंडर कार गिफ्ट; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप
1

एका कंत्राटदाराने सत्ताधारी 21 आमदारांना दिली 25 कोटींची डिफेंडर कार गिफ्ट; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी सुरु; महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना
2

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी सुरु; महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

राहुल गांधींना बनायचं नक्की काय, मिठाईवाला की राजकारणी? वळले लाडू अन् तळल्या जिलेबी
3

राहुल गांधींना बनायचं नक्की काय, मिठाईवाला की राजकारणी? वळले लाडू अन् तळल्या जिलेबी

Bihar Elections 2025: बिहारमध्ये महिलांना महत्त्व किती? मतांसाठी आकर्षित योजना मात्र प्रतिनिधित्वासाठी उमेदवारी नगण्य
4

Bihar Elections 2025: बिहारमध्ये महिलांना महत्त्व किती? मतांसाठी आकर्षित योजना मात्र प्रतिनिधित्वासाठी उमेदवारी नगण्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.