
PM Narendra Modi event in Lucknow flowers and trees theft by people Viral video
लखनऊ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम संपल्यानंतर, लोक फुलझाडांची कुंडी चोरताना दिसले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये लोक त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात सजावटीसाठी लावण्यात आलेल्या फुलांच्या कुंड्या चोरुन घेऊन जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमानंतर लगेचच ही लज्जास्पद घटना घडली आहे. यावरुन नेटकऱ्यांनी जोरदार टीका देखील केली.
हे देखील वाचा : ‘I have a dream, जसे 1971 मध्ये सर्व धर्म एकत्र…; हिंदूंवरील हल्ल्यांवर Tariq Rahman नक्की काय म्हटले?
शहराला हिरवे करण्याचा प्रयत्न अयशस्वी
२५ डिसेंबर रोजी, दिवंगत नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त, गोमती नदीच्या काठावर असलेल्या या भव्य जागेचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. एलडीए आणि महानगरपालिकेने राष्ट्रीय प्रेरणा स्थळ मार्ग, ग्रीन कॉरिडॉर आणि वसंत कुंज रोड सजवण्यासाठी हजारो आकर्षक फुलांची कुंड्या भिंती बसवल्या होत्या. ही आकर्षक शोभेची आणि फुलांची झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मात्र या लक्षवेधी झाडांवर नंतर प्रेक्षकांनी आणि शहरात राहणाऱ्यांनी डल्ला मारला. शहराला हिरवे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते मात्र नागरिकांनी शहर नाही तर घर सजवण्यासाठी ही सर्व झाडे घरी नेली.
मोदी जी लखनऊ से चले गए और लखनऊ वालों ने गमले चुराना शुरू कर दिया😂😂 pic.twitter.com/TqlVHGfgmH — Kavish Aziz (@azizkavish) December 25, 2025
पंतप्रधान मोदी निघताच चोरी
कार्यक्रमांसाठी नगर विकास खात्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये शहराची सजावट करण्यात आली होती. मात्र पंतप्रधानांचा कार्यक्रम संपताच लगेचच परिस्थिती बदलली. लोकांनी फुलांच्या कुंड्या उचलण्यास सुरुवात केली, काही जण हातात घेऊन गेले, तर काही जण दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन येऊन त्यामध्ये भरुन घेऊन गेले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी या अशा चोऱ्या या शहराच्या प्रतिमेला कलंक लावतात अशी टीका केली. प्रशासन परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी कठोर परिश्रम करत असताना, काही लोकांच्या संकुचित वृत्तीमुळे सर्व काही बिघडत आहे.
हे देखील वाचा : पैसा है कैसा…नही कोई ऐसा! धनाढ्यांकडून निवडणूक हायजॅक; सामान्यांसाठी…
Civic Sense चा अभाव
अशी कृत्ये करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. ही घटना लखनौमध्ये झालेल्या “फुलपाखरे चोरी” ची आठवण करून देते, जिथे मुख्यमंत्री योगी यांनी अशा घटनांना नागरी जाणीवेचा अभाव म्हणून टीका केली होती. फुलपाखरे चोरी ही नागरी जाणीवेचा तीव्र अभाव दर्शवते, कारण त्यात वैयक्तिक फायद्यासाठी सार्वजनिक किंवा सामुदायिक मालमत्तेचा गैरवापर केला जात आहे.