Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मावळ तालुक्यात रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी संकलनाचे काम सुरू होते.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2026 | 10:44 AM
Voting in full swing in Maval taluka for Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections

Voting in full swing in Maval taluka for Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान पार
  • रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी संकलनाचे काम
  • राजकारणाचा उत्साह पोहचला शिगेला
Maval Political news : वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. (Political News) सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत एकूण ७७.२५ टक्के मतदान झाल्याची नोंद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी संकलनाचे काम सुरू होते. या निवडणुकीदरम्यान मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी विविध राजकीय पक्षांची चांगलीच कसरत पाहायला मिळाली. ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. (Pune News)

एकूण मतदार व मतदानाचा तपशील
मावळ तालुक्यातील एकूण मतदारसंख्या २,००,३१६ इतकी असून त्यामध्ये

  • पुरुष मतदार: १,०२,०८२
  • महिला मतदार: ९८,२२६
  • इतर: ८

सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत—
  • ७९,७९३ पुरुष,
  • ७४,९४५ महिला,
  • २ इतर,
    अशा एकूण १,५४,७४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
हे देखील वाचा : मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये मतदानाचे प्रमाण लक्षणीय राहिले.

  • इंदुरी (३०) – ८०.५४%
  • सोमाटणे (३३) – ७८.३२%
  • खडकाळे (३१) – ७८.३२%
  • कुसगाव बु. (३२) – ७६.२९%
  • टाकवे बु. (२९) – ७५.३२%
    पंचायत समिती गणनिहाय मतदान
    पंचायत समिती मावळ अंतर्गत काही गणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली.
  • वडेश्वर (५९) – ८२.०९%
  • चांदखेड (६६) – ८०.९७%
  • काळे (६४) – ८०.३०%
  • टाकवे बुद्रुक (५७) – ७९.३५%
तर नाणे, सोमाटणे, कुसगाव बुद्रुक, खडकाळे या गणांमध्येही ७० ते ७५ टक्क्यांदरम्यान मतदान झाले.

प्रशासनाचा चोख बंदोबस्त

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, वडगाव पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख तसेच कामशेत पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था व मार्गदर्शनासाठी कर्मचारी तैनात होते.

हे देखील वाचा : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

मिनी विधानसभा ठरलेल्या निवडणुकीत प्रतिष्ठेची लढत

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मावळ तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आमदार सुनील शेळके तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी या निवडणुकीत एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडल्याने आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अनेक ठिकाणी थेट दोन पक्षांत लढत रंगली, तर काही मतदारसंघांमध्ये चौरंगी लढतीचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमने-सामने उभे ठाकल्याने भाजप आपला गड राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस विजय खेचून आणणार, याबाबत तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत

मावळ तालुक्यात झालेल्या ७७.२५ टक्के मतदानाने लोकशाही प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास अधोरेखित केला आहे. विशेषतः महिला व तरुण मतदारांचा सहभाग उल्लेखनीय ठरला असून आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतमोजणी व निकालांकडे लागले आहे.

Web Title: Voting in full swing in maval taluka for pune zilla parishad and panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • maval news
  • political news
  • pune news

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
2

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
4

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.