PM Narendra Modi expresses condolences reacts to Prayagraj Mahakumbh stampede
प्रयागराज : उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ मेळा भरला आहे. 144 वर्षांनी भरणाऱ्या या मेळ्याकडे संपूर्ण देशाचे नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. नागा साधूंच्या या मेळ्यामध्ये मोठा उत्साह दिसून येत असला तरी प्रयागराजमध्ये दुर्घटना झाली आहे. मौनी अमावस्येमुळे अमृत स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 17 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे.
प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी झाल्यामुळे कुंभमेळ्यातील व्यवस्थापनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाकुंभातील संगमवर असलेलं एक बॅरिअर तुटल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. या घटनेवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच ज्या भाविकांनी जीव गमावला आहे त्यांच्याबाबत शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रयागमधील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे की, प्रयागराज महाकुंभात घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. यासोबतच, सर्व जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे आणि मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
प्रयागराज महाकुंभ में हुआ हादसा अत्यंत दुखद है। इसमें जिन श्रद्धालुओं ने अपने परिजनों को खोया है, उनके प्रति मेरी गहरी संवेदनाएं। इसके साथ ही मैं सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। स्थानीय प्रशासन पीड़ितों की हरसंभव मदद में जुटा हुआ है। इस सिलसिले में मैंने…
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2025
महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी आहे. आज प्रयागराजमध्ये सुमारे ८-१० कोटी भाविक उपस्थित आहेत. काल सुमारे ५.५ कोटी भाविकांनी महाकुंभात स्नान केले. संगम नाक्यावर भाविकांच्या हालचालींमुळे खूप ताण आहे. रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान आखाडा मार्गावरील बॅरिकेड्स ओलांडताना काही भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाने स्थानिक पातळीवर जोरदार मोहीम सुरू केली आहे. भाविकांना सुरक्षित स्नान मिळावे यासाठी सरकार राज्य युद्ध पातळीवर सतत काम करत आहे. पंतप्रधान मोदींनी सकाळपासून सुमारे ४ वेळा भाविकांची माहिती घेतली आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सकाळपासून भाविकांची माहिती घेतली आहे, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, प्रयागराजमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे पण गर्दीचा दबाव अजूनही खूप जास्त आहे. मी देखील संतांशी बोलल्यानंतर, त्यांनी मला नम्रपणे सांगितले आहे की भक्तांनी प्रथम स्नान करावे आणि नंतर मंदिरात जावे. ते गेल्यानंतरच आपण स्नानासाठी संगमाकडे जाऊ. सर्व आखाड्यांनी यावर सहमती दर्शविली. आहेत. लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे. संयमाने काम करा. हा कार्यक्रम लोकांसाठी आहे. प्रशासन त्यांच्या सेवेसाठी समर्पित आहे. सरकार सर्व प्रकारचे सहकार्य ताकदीने देण्यास तयार आहे… फक्त संगम नाक्यावरच येणे आवश्यक नाही. १५-२० किलोमीटरच्या परिघात तात्पुरते घाट बांधले आहेत, तुम्ही जिथे असाल तिथे आंघोळ करा.” असे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.