Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची हाय व्होल्टेज बैठक; संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही सैन्यप्रमुखांची उपस्थिती

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 29, 2025 | 06:33 PM
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची हाय व्होल्टेज बैठक; संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही सैन्यप्रमुखांची उपस्थिती

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची हाय व्होल्टेज बैठक; संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही सैन्यप्रमुखांची उपस्थिती

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये दिस आहे. पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान उपस्थित होते.

Pahalgam Terror Attack: LOC वर घडामोडींना वेग; हवाई दलासह सैन्याला हायअलर्टचा आदेश

या बैठकीस थलसेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे देखील उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीत पहलगाम हल्ल्यानंतरची सुरक्षास्थिती, दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमा आणि भविष्यातील धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली.

#WATCH | PM Narendra Modi chairs a meeting with Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, CDS and chiefs of all the Armed Forces. pic.twitter.com/Wf00S8YVQO — ANI (@ANI) April 29, 2025

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या बैठकीत हल्ल्याची पार्श्वभूमी, सुरक्षा दलांची कृती आणि पुढील रणनीतीवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याचे दोषी कोण आहेत, यांच्याविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच अमरनाथ यात्रा आणि इतर नागरी उपक्रमांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर होऊ नये, याचीही त्यांनी खातरजमा केली आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत संसदेमध्ये विशेष अधिवेशन घ्या…; मल्लिकार्जुन खर्गेंची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. याला अलीकडच्या काळातील सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानले जात आहे. या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचा शोध सुरू असून सुरक्षा दलांकडून विविध ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन्स सुरू आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर विविध प्रकारचे निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Pm narendra modi high level meeting with defence minister rajnath singh nsa ajit doval and army chief cds anil chauhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • Indo-Pak Relation
  • Pahalgam Terror Attack
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?
1

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…
2

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…

PM Modi News:  एक उत्कृष्ट समकालीन नेता’;पंतप्रधान मोदींनी लिहीली जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना
3

PM Modi News: एक उत्कृष्ट समकालीन नेता’;पंतप्रधान मोदींनी लिहीली जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना

नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य धात्रींचा पुण्यात विशेष सन्मान; भाजप वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम
4

नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य धात्रींचा पुण्यात विशेष सन्मान; भाजप वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.