PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल ओडीशा दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी एका विशाल जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कॉँग्रेसवर जोरदार निशाण साधला. तसेच कॅनडामध्ये झालेल्या जी-७ परिषदेतील एक महत्वाची घडामोड देखील सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभेला संबोधित करत असताना म्हणाले,”अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला अमेरिकेला येण्याचे आणि भोजनाचे निमंत्रण दिले होते, अंतर मी त्यांना विनम्रपणे नकार दिला. कारण ओडीशाची ही पुण्यभूमी मला इथे येण्यापासून रोखू शकली नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभेत म्हणाले, “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला त्यांच्यासोबत अमेरिकेत येऊन भोजन करण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र मी त्यांच्या निमंत्रणाला विनम्रपणे नकार दिला. कारण मला इकडे तुमच्याशी संवाद साधण्याची इच्छा होती.” म्हणून मी त्यांचे निमंत्रण नाकारले. या मुळे सभेतील लोकांनी मोदी यांना जोरदार प्रतिसाद दिला.
#WATCH | Bhubaneswar, Odisha: "Just two days ago, I was in Canada for the G7 summit and the US President Trump called me. He said, since you have come to Canada, go via Washington, we will have dinner together and talk. He extended the invitation with great insistence. I told the… pic.twitter.com/MdLsiYnNCQ
— ANI (@ANI) June 20, 2025
नरेंद्र मोदींची कॉँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेतून कॉँग्रेसवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, “स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाने कॉँग्रेसचे राज्य पाहिले. ज्यामध्ये सुशासन आणि विकास कमी तर भ्रष्टाचार जास्त पाहायला मिळाला.” भाजप सत्तेत आल्यावर देशाने वेगवान विकास होताना पाहिला आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
मोदी पुढे म्हणाले, ” या आधी जिथे ज्या राज्यात भाजप सरकार नव्हते आणि आता तिथे भाजपचे सरकार आहे. त्या राज्यांनी देखील विकासाचा वेग पाहिला आहे. आसाम आणि त्रिपुरा राज्यात आता हिंसा आणि अस्थिरता या ऐवजी प्रगती आणि शांतीचे वातावरण आहे.”
PM Modi : PM मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान
सायप्रस सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ने नरेंद्र मोंदींचा सन्मान करण्यात आला. सायप्रसची राजधानी निकोसिया येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या भव्य समारंभात राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सायप्रसचे पहिले राष्ट्रपती मकारियोस तृतीय यांच्या सन्मानार्थ आणि राष्ट्रसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जागतिक स्तरावरील प्रभावशाली व्यक्तींना हा सन्मान देऊन गौरव केला जातो. सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. त्यांनी म्हटले, “हा सन्मान फक्त माझा नाही, तर तो भारतातील प्रत्येक नागरिकाचा आहे. हा त्यांच्या सामर्थ्य, आशा-आकांक्षा आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान आहे. अशा भावना त्यांनी वक्त केल्या.
मोदी यांनी भारत आणि सायप्रसमधील मैत्रीला आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाशी जोडून, दोन्ही देशांतील सामायिक मूल्यं, शांतता, सुरक्षा आणि समृद्धीसाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक म्हणून हा सन्मान स्वीकारला.
दोन दशकांनंतर पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानांचा सायप्रस दौरा आहे. मोदी यांचे लारनाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर सायप्रसचे राष्ट्रपती स्वतः त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर लिमासोल येथील भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या उत्साहात स्वागत केल.