कोणत्याही परिस्थितीत सायंकाळपर्यंत तेहरान सोडा, परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश, ; इराणमध्ये अडकलेत १० हजार भारतीय
इराण इस्रायलमधील तणाव वाढत असून इराणने तेल अविवमधील अमेरिकेच्या दूतावावर हल्ला केला आहे. युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकारने इराणची राजधानी तेहरानमधील भारतीय नागरिकांना सायंकाळपर्यंत शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. सध्या इराणमध्ये 10000 भारतीय नागरिक आणि 1500 विद्यार्थी अडकले आहेत.इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पाश्वभूमीवर भारतीय विद्यार्थी आणि नोकरीसाठी इराणमध्ये गेलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आल्याची माहिती आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि दूतावासाने, ज्यामध्ये म्हटले आहे की तेहरानमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी,त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा व्हिसा असो, आज संध्याकाळपर्यंत इराणची राजधानी तेहरान सोडावे, असं निवेदन जारी केल्यांचं वृत्त एका राष्ट्रीय वृत्तपत्राने दिलं आहे.
इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले आहेत, त्यापैकी १५०० विद्यार्थी आहेत आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची तयारी देखील सुरू झाली आहे. भारत सरकारने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की इराणमध्ये उपस्थित असलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी पाठवले जात आहे इराण सरकारनेही, सर्व विमानतळ बंद आहेत परंतु जमिनीवरील सीमेवरून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे शक्य असल्याचं भारत सरकारला सांगितलं आहे. इराणने सर्व भारतीयांची माहिती मागितली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना घरातच राहण्यास सांगितले आहे. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की दूतावासाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, “तेहरानमधील भारतीय दूतावास सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधत आहे जेणेकरून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.
युद्धादरम्यान भारतीय दूतावासाने इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी सूचना जारी केल्या आहेत. भारतीय दूतावासाने लोकांना अनावश्यक प्रवास किंवा हालचाल टाळण्याचे आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. यासाठी २४/७ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाने रविवारी सांगितले की सर्व भारतीय सुरक्षित आहेत. भारतीय दूतावास या प्रदेशातील परिस्थिती आणि त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर सतत लक्ष ठेवून आहे. दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांना घाबरू नका, सावधगिरी बाळगा आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सध्या १५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी इराणमध्ये आहेत. इराणमधील तेहरानमधील भारतीय दूतावासाने तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना हलविण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे. दूतावासाने म्हटले आहे की सर्व भारतीय विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी सकाळी ९:३० (स्थानिक वेळेनुसार) पर्यंत वेलेंजाक विद्यापीठाच्या गेट क्रमांक २ वर हजर राहावे. सकाळी १०:०० वाजता कोम शहरासाठी बसे निघतील. हा आदेश शाहिद बेहेश्ती मेडिकल सायन्सेस विद्यापीठातील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना लागू आहे, ज्यामध्ये वसतिगृहे आणि खाजगी अपार्टमेंटमध्ये राहणारे विद्यार्थी देखील समाविष्ट आहेत. कोणत्याही भारतीय विद्यार्थ्यांनी मुलांच्या किंवा मुलींच्या वसतिगृहांमध्ये किंवा खाजगी अपार्टमेंटमध्ये राहू नये. त्यांना हा संदेश व्यापकपणे प्रसारित केला जाईल.
इस्रायली सैन्याने १३ जून रोजी सकाळी इराणवर पहिला हल्ला केला, ज्याला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव देण्यात आले. या कारवाईअंतर्गत इस्रायलने २०० हून अधिक लढाऊ विमानांद्वारे इराणच्या १०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. यापैकी बहुतेक इराणच्या अणु आणि लष्करी तळांचा समावेश होता.
‘ऑपरेशन रायझिंग लायन’ला प्रत्युत्तर म्हणून इराणने ‘ट्रू प्रॉमिस ३’ देखील सुरू केले आहे. इस्रायलने ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म ‘३’ सुरू केले आहे. याअंतर्गत, रात्री उशिरा तेल अवीव आणि जेरुसलेमवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. एवढेच नाही तर इस्रायलवर लेबनॉन आणि जॉर्डनमधूनही हल्ला करण्यात आला आहे. यानंतर, इस्रायलने पुन्हा इराणवर हवाई हल्ले सुरू केले. गुरुवारी पहाटे इस्रायली संरक्षण दलाने इराणच्या लष्करी आणि अणु तळांना लक्ष्य केले, ज्यामध्ये इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणमध्ये ७८ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३५० लोक जखमी झाले आहेत. दोन्ही देशांमधील युद्ध सुरूच आहे.
इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेले हे युद्ध केवळ भू-राजकीय तणाव नाही तर कुठेतरी ते धर्म आणि वर्चस्वाची लढाई देखील बनत आहे. दोन्ही देश त्यांच्या धार्मिक प्रतीकांचा आणि श्रद्धेचा आधार घेऊन या संघर्षाला वैचारिक आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. युद्धाच्या दरम्यान हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, अशा परिस्थितीत सर्व भारतीय नागरिक लवकरात लवकर भारतात परतण्याची वाट पाहत आहेत. हे युद्ध किती काळ चालेल, जगाला त्यातून काय नुकसान सहन करावे लागेल हे काळच सांगेल.