Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? संसदेत अविश्वास प्रस्ताव कसा आणला जातो?

गेल्या दोन दिवसांत अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला. मणिपुर हिंसाचारावरुन विरोधकांनी मोदी सरकार ताशेरे ओढले. नुकतंच खासदारकी बहाल झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत नरेंद्र मोदींच्या मणिपुरला भेट न देण्यावरुन प्रश्न उपस्थित केले होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 11, 2023 | 11:30 AM
अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? संसदेत अविश्वास प्रस्ताव कसा आणला जातो?
Follow Us
Close
Follow Us:

गुरुवारी (१० ऑगस्ट) लोकसभेत मोदी सरकारच्या (Narendra Modi) विरोधात विरोधी आघाडी ‘INDIA’ने आणलेला अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरला. केंद्र सरकारने आवाजी मतदानाने (Voice Vote) अविश्वास ठराव जिंकला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा २०२४ च्या निवडणुकीतील विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा दावा केला असून २०२८ मध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील असे म्हटले आहे. मात्र, विरोधकांना आणलेला हा अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? संसदेत अविश्वास प्रस्ताव कसा आणला जातो? हे तुम्हाला माहीत आहे का?

[read_also content=”राहुल गांधींकडे मुलींची कमतरता नाही, ते ५० वर्षीय महिलेला फ्लाइंग किस देतील का? काँग्रेस आमदार नीतू सिंह यांचा सवाल https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-has-no-shortage-of-girl-why-he-would-give-flaying-kiss-to-smti-iarani-nrps-443609.html”]

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

काल संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “2018 मध्ये, सभागृह नेता म्हणून मी त्यांना 2023 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याचे काम दिले होते.” आता मी त्यांना 2028 मध्ये आणण्याचे काम देत आहे, पण किमान तयारी करून या. जेणेकरुन जनतेला तरी तो विरोधी पक्षाच्या लायकीचा वाटतो.

अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय?

लोकशाही राज्यव्यवस्था आणि संसदीय परंपरा यांमध्ये अविश्वास प्रस्ताव ( No Confidence Motion) हा महत्वाचा भाग आहे. सत्ताधारी पक्षाच्या सरकारने सभागृहात आपला विश्वास गमावला आहे, असं विरोधी पक्षाला वाटतं तेव्हा अविश्वास प्रस्ताव आणला जातो. इंग्रजीत अविश्वास प्रस्तावाला ‘नो कॉन्फिडन्स मोशन’ म्हणतात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ७५ मध्ये याबाबद नमूद करण्यात आले आहे.

एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर विरोधकांची नाराजी असल्यास त्या पक्षातील खासदार त्या विषयावर नोटीस देतात. यावेळी हा विषय मणिपूर आहे. तर काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी नोटीस दिली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष सभागृहात त्याचे वाचन करतात. त्या नोटीशीला 50 खासदारांचा पाठिंबा मिळाला तर वादावादी होते. गौरव गोगोई यांनी दिलेल्या नोटिशीला पन्नास खासदारांनी पाठिंबा दिला, त्यामुळे त्यावर चर्चा सुरू झाली. या चर्चेनंतर मतदानही होते. चर्चेत विरोधक त्यांना खुपणाऱ्या मुद्द्यावर आरोप करतात, मग त्याला सरकारकडून उत्तर दिले जाते. या चर्चेनंतर प्रथेप्रमाणे मतदान होते.

नियम 198(1)(a) नुसार, अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या सदस्याला लोकसभा अध्यक्षांनी बोलावले असता सभागृहाची परवानगी घ्यावी लागते.

नियम 198(1)(B) नुसार, सकाळी 10.00 वाजेपर्यंत अविश्वास प्रस्तावाची लेखी सूचना महासचिवांना द्यावी लागते.

नियम 198(2) नुसार, अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. ही संख्या 50 पेक्षा कमी असल्यास प्रस्ताव स्वीकारला जात नाही.

नियम 198(3) नुसार, सभापतींची परवानगी घेतल्यानंतर, अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी दोन ते तीन दिवस निश्चित केले जातात.अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत त्यावर चर्चा करावी लागते.

नियम 198(4) नुसार, चर्चेच्या शेवटच्या दिवशी सभापती मतदान घेतात. त्यावरुन निर्णय जाहीर करतात.

Web Title: Pm narendra modi will answer on no confidence motion in parliament nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2023 | 10:25 AM

Topics:  

  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?
1

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?

PM मोदींना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्याने वाद वाढला! भाजप नेत्यांकडून बिहार बंदची हाक
2

PM मोदींना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्याने वाद वाढला! भाजप नेत्यांकडून बिहार बंदची हाक

Bihar Politics: 16 दिवस एकत्र, तेजस्वी यादवची ओंजळ रिकामीच; राहुल गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे महाआघाडीत पडणार फूट
3

Bihar Politics: 16 दिवस एकत्र, तेजस्वी यादवची ओंजळ रिकामीच; राहुल गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे महाआघाडीत पडणार फूट

Rahul Gandhi Patna Live: अॅटम बॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब! राहुल गांधीचा केंद्र आणि निवडणूक आयोगाला सूचक इशारा
4

Rahul Gandhi Patna Live: अॅटम बॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब! राहुल गांधीचा केंद्र आणि निवडणूक आयोगाला सूचक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.