Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?

राहुल गांधी यांनी या यात्रेदरम्यान ‘वोटचोरी’चा मुद्दा जोरदारपणे मांडला, ज्यामुळे नागरिकांमध्ये सरकारविषयी नकारात्मक भावना वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 07, 2025 | 09:44 AM
Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?
Follow Us
Close
Follow Us:
  • महागठबंधन आणि एनडीए आघाडीत चुरशीचे वातावरण
  • एसआयआर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात
  • भाजपमध्ये सतत इनकमिंग, एनडीएची ताकद वाढली

Bihar Election 2025:  बिहार विधानसभा निवडणुका अगदी जवळ आल्या असून महागठबंधन आणि एनडीए आघाडीत चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी सतत दौरे करत आहेत, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढील पाच वर्षांत 1 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी सुरू केलेली “मतदार अधिकार यात्रा” आणि त्यातून समोर आलेला ‘वोटचोरी’चा मुद्दा चर्चेत आहे. त्याचप्रमाणे जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर यांची “बिहार बदलाव यात्रा” देखील राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरुद्ध वाढणारी नाराजी, प्रशांत किशोर कोणत्या समाजघटकातून उमेदवार उभे करतात यावरील उत्सुकता, तसेच ‘एसआयआर’ प्रक्रियेचा नागरिकांवर होणारा परिणाम – या सर्व गोष्टींवर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ या संस्थेने बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे.

Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना मिळतोय विरोधी पक्षांकडून चांगला प्रतिसाद; आता ‘या’ पक्षाने दिला पाठिंबा

निवडणूक आयोगाची एसआयआर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

बिहारमध्ये निवडणूक आयोगाने जून 2025 मध्ये SIR (Special Intensive Revision) प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया 24 जून ते 25 जुलैपर्यंत राबवण्यात आली, ज्यात तब्बल 7 कोटी 24 लाख फॉर्म जमा झाले. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या यादीत मोठे घोळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महागठबंधनच्या नेत्यांनी विशेषतः मुस्लीम आणि गरिब मतदारांना यादीतून जाणूनबुजून वगळले जात असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली “मतदार अधिकार यात्रा” सुरू करण्यात आली आहे.

विरोधकांच्या मते, अनेक जिवंत मतदारांना मृत दाखवण्यात आले असून, यामागे राज्य आणि केंद्र सरकारचे कारस्थान असल्याचे ते सांगत आहेत. या आरोपांमुळे जनतेत गोंधळ आणि असंतोष वाढला आहे. आमच्या टीमने घेतलेल्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया पाहता, एसआयआर प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये गंभीर शंका आणि नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे.

Numerology: पितृपक्षाचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

राहुल गांधींची “मतदार अधिकार यात्रा” आणि ‘वोटचोरी’चा मुद्दा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील “मतदार अधिकार यात्रा” 17 ऑगस्ट रोजी सासाराम येथून सुरू झाली. 16 दिवस चाललेल्या या यात्रेचा समारोप 1 सप्टेंबर रोजी पाटणा येथे झाला. या काळात सुमारे 1300 किमीचा प्रवास करत 200 हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा दौरा करण्यात आला. यात्रेत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव, सीपीआयएमएलचे दीपांकर भट्टाचार्य, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम, व्हीआयपीचे मुकेश साहनी आणि खासदार पप्पू यादव यांसारखे महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांनी या यात्रेदरम्यान ‘वोटचोरी’चा मुद्दा जोरदारपणे मांडला, ज्यामुळे नागरिकांमध्ये सरकारविषयी नकारात्मक भावना वाढल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, रोहतास, औरंगाबाद, नवादा, गया, मुंगेर, भागलपूर, कटिहार, पूर्णिया, अररिया, सुपोल, दरभंगा, सीतामढी, मुझफ्फरपूर, पूर्व आणि पश्चिम चंपारण या जिल्ह्यांमध्ये महागठबंधनला याआधीच यश मिळाले होते. त्यामुळे या भागात मतदारांचा कल अधिक बळकट करण्यासाठीच यात्रेचे नियोजन करण्यात आल्याचे दिसून येते.

US Open 2025 : Aryna Sabalenka ने यूएस ओपन ग्रँड स्लॅमचा जिंकला मुकुट… सलग दुसऱ्यांदा विजेता बनली

भाजपमध्ये सतत इनकमिंग, एनडीएची ताकद वाढली

अलीकडच्या काळात अनेक मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी केंद्रीय मंत्री नागमणी, बिहार सरकारच्या माजी मंत्री सुचित्रा सिन्हा आणि माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी पक्षात प्रवेश केला. याशिवाय, 17 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गया येथील सभेत आरजेडीचे नवादा येथील आमदार विभा देवी (राजवल्लभ यादव यांची पत्नी) आणि रजौलीचे आमदार प्रकाश वीर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे एनडीएची ताकद आणखी वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बिहारमधील जातीय कल : एनडीएला तुलनेत जास्त पाठिंबा

बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत जातीय समीकरणे पुन्हा एकदा ठळकपणे समोर येत आहेत. यादव आणि मुस्लीम मतदार हे आरजेडीचे मुख्य बळ मानले जाते, तर मल्लाह समाजातील मतदार महागठबंधनमधील व्हीआयपी पक्षाकडे झुकलेले दिसतात. काही दलित समाजामध्येही आरजेडी आणि काँग्रेसचा प्रभाव जाणवतो. काँग्रेसने रविदास समाजातील राजेश कुमार यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याने, दलित मतदारांमध्ये काँग्रेसला काही प्रमाणात पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढली आहे.

दुसरीकडे, भूमिहार, राजपूत आणि ब्राह्मण मतदारांचा कल भाजपकडे असल्याचे आढळले. तसेच सवर्ण, कुशवाहा (कोयरी, कुर्मी), इतर ओबीसी, पासवान आणि मांझी समाजातील मतदार मोठ्या प्रमाणावर एनडीएला पसंती देत आहेत. चिराग पासवान आणि जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या समाजातील मतदारांचा झुकावही एनडीएकडे वाढला आहे. रुद्र रिसर्चच्या टीमने घेतलेल्या प्रत्यक्ष संवादातून, जातीय समीकरणांमध्ये महागठबंधनच्या तुलनेत एनडीएला अधिक पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: Bihar election 2025 who will come to power in bihar shocking revelations from the ground report of a pune based organization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • Congress
  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Bihar Election 2025 : देशभरात एकाच वेळी SIR लागू करणार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
1

Bihar Election 2025 : देशभरात एकाच वेळी SIR लागू करणार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान
2

Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Akhilesh Toti Chori : अखिलेश यादव यांनी चोरले शासकीय निवासस्थानातील नळ? भाजप आमदारांविरोधात दाखल करणार 5 कोटींचा मानहानीचा दावा
4

Akhilesh Toti Chori : अखिलेश यादव यांनी चोरले शासकीय निवासस्थानातील नळ? भाजप आमदारांविरोधात दाखल करणार 5 कोटींचा मानहानीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.