Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime : धक्कादायक! मुलीची शाळेची फी भरण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपतीची हत्या, असं उलगडलं खूनाचं गूढ

बिहारची राजधानी पाटण्यात चार दिवसांपूर्वी घडलेल्या प्रसिद्ध उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्येमागील कारणांची आणि आरोपींच्या भूमिकांची माहिती आता हळूहळू समोर येत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 09, 2025 | 02:18 AM
धक्कादायक! मुलीची शाळेची फी भरण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपतीची हत्या, असं उलगडलं खूनाचं गूढ

धक्कादायक! मुलीची शाळेची फी भरण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपतीची हत्या, असं उलगडलं खूनाचं गूढ

Follow Us
Close
Follow Us:

बिहारची राजधानी पाटण्यात चार दिवसांपूर्वी घडलेल्या प्रसिद्ध उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्येमागील कारणांची आणि आरोपींच्या भूमिकांची माहिती आता हळूहळू समोर येत आहे. या खूनप्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली असून, या हत्येचा कट अशोक साव नावाच्या व्यक्तीने रचल्याचे निष्पन्न झाले आहे. जमीनविवादातून खेमका यांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

BJP New President : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची प्रतिक्षा संपली! उत्तर भारतातील या नावावर शिक्कामोर्तब?

बिहारचे पोलीस महासंचालक (DGP) विनय कुमार यांनी ८ जुलै रोजी पत्रकार परिषदेत या हत्येप्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला. या प्रकरणातील मुख्य शूटर उमेश यादव याला अटक करण्यात आली असून, त्याने केवळ ४० हजार रुपयांच्या अ‍ॅडव्हान्सवर ही सुपारी स्वीकारल्याचे समोर आले आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, या अ‍ॅडव्हान्समधून उमेशने आपल्या मुलीच्या शाळेची ४५ हजार रुपयांची फी भरण्यासाठी रक्कम खर्च केली.

पोलिस तपासात असेही समोर आले की, उमेश यादव गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होता. मुलीची फी भरता न आल्यामुळे तो खूपच तणावात होता. त्याच दरम्यान आरोपी अशोक सावने त्याच्याशी संपर्क साधून खेमका यांना ठार मारण्यासाठी चार लाखांची सुपारी दिली. उमेशने लगेच अ‍ॅडव्हान्स रक्कम घेतली आणि त्यातून सर्वप्रथम आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण केला.

या घटनेमुळे बिहारमधील वाढती गुन्हेगारी, जमीनविवादातील हिंसक वळण आणि आर्थिक विवंचनेतून गुन्हेगारीकडे वळणाऱ्या लोकांचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित दुचाकीची ओळख पटवली आणि त्यावरून उमेश यादवपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं आहे.

त्याच्या अटकेनंतर चौकशीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या असून, पोलीस खात्याच्या मते या प्रकरणात अजूनही काही बड्या नावांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. अशोक साव आणि खेमका यांच्यातील जमीनविवाद ही संपूर्ण हत्याकांडाची मुळं असून, आर्थिक आणि सामाजिक पातळीवरील असमतोल गुन्हेगारीला कसा खतपाणी घालतो, याचे हे विदारक उदाहरण ठरत आहे.

Chandrashekhar Azad : चंद्रशेखर आझाद आणि भाजप नेत्याच्या गुप्त बैठका, रोहिणी घावरीच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, या प्रकरणामुळे बिहारमधील राजकीय वातावरणही तापले असून, वाढत्या सुपारी किलिंगच्या घटनांवरून सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता पुढील तपासातून आणखी कोणकोणाची नावं बाहेर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Police cracked gopal khemka case school fees led to hitman involvement in killing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 11:39 PM

Topics:  

  • Bihar Crime News
  • Business News
  • crime news

संबंधित बातम्या

LIC चे नव्या वर्षात नवे 5 प्लान, सुरक्षा, बचत आणि पेन्शनसह मिळणार एकापेक्षा एक फायदे
1

LIC चे नव्या वर्षात नवे 5 प्लान, सुरक्षा, बचत आणि पेन्शनसह मिळणार एकापेक्षा एक फायदे

आम्रपाली ग्रुपवर ईडी फास आवळला, 99 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई
2

आम्रपाली ग्रुपवर ईडी फास आवळला, 99 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई

Budget 2026 : २०२६ च्या अर्थसंकल्पात घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी? गृहकर्ज स्वस्त होणार!
3

Budget 2026 : २०२६ च्या अर्थसंकल्पात घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी? गृहकर्ज स्वस्त होणार!

99th Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ला; पोलिसांनी थेट…
4

99th Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ला; पोलिसांनी थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.