Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisha Rajysabha Election: ओडिशात राजकीय भूकंप; बीजेडी आणि काँग्रेसच्या ११ आमदारांचे ‘क्रॉस-व्होटिंग’

काँग्रेसमध्येही मोठी फूट दिसून आली आहे. प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी आपली मुलगी सोफिया फिरदौस आणि रमेश जेना यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 16, 2026 | 07:15 PM
Odisha Politics, RajyaSabha Election, Cross Voting, Naveen Patnaik, BJD

Odisha Politics, RajyaSabha Election, Cross Voting, Naveen Patnaik, BJD

Follow Us
Close
Follow Us:
  • ओडिशा राज्यसभा निवडणुकीत बीजेडीचे ५ आणि काँग्रेसचे ३ यांसह एकूण ११ आमदारांचे क्रॉस व्होटिंग
  • देवी रंजन त्रिपाठी यांनी बीजेडी-काँग्रेसमधील ‘अनैतिक युती’ अमान्य असल्याचे सांगत उघडपणे बंडखोरी
  • नवीन पटनायक यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत, एका आमदाराला बेकायदेशीरपणे दुसरी मतपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा दावा
Odisha Rajysabha Election: ओडिशातील राज्यसभा निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी बंडखोरी केल्याचे वृत्त आहे. ओडिशाच्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशाच्या राज्यसभा निवडणुकीत सुमारे १० विरोधी आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केली. बिजू जनता दलाच्या पाच आणि काँग्रेसच्या तीन आमदारांनी राज्यसभेचे उमेदवार दिलीप रे यांच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केल्याची राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ओडिशात राज्यसभा निवडणुकीदरम्यान बीजेडी आणि काँग्रेसच्या तब्बल ११ आमदारांनी पक्षादेश डावलून क्रॉस-व्होटिंग केले. बीजेडीचे आमदार देवी रंजन त्रिपाठी यांनी आपण भाजप समर्थित उमेदवार दिलीप रे यांना मतदान केल्याची जाहीर कबुली दिली आहे. बीजेडी आणि काँग्रेसमधील ‘अनैतिक युती’ आपल्याला मान्य नसल्याने आणि बिजू पटनायक यांचा वारसा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

BJP Candidate List : पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा गड ढासळणार? BJP च्या 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

तर, काँग्रेसचे दशरथी गोमांगो, सोफिया फिरदौस, रमेश चंद्र जेना तसेच बीजेडीचे चक्रमणी कन्हार, सुभाषिनी जेना, सौविक बिस्वाल आणि अन्य निलंबित आमदारांनी भाजप पुरस्कृत उमेदवार दिलीप रे यांच्या बाजूने मतदान केल्याची समोर आले. या मोठ्या बंडाळीमुळे ओडिशामध्ये राजकीय गोंधळ निर्माण झाला असून दोन्ही पक्षांतील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे.

ओडिशात सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. ब्रह्मगिरी विधानसभा मतदारसंघातील एका आमदाराने मतदानावेळी चूक केल्यानंतर, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना बेकायदेशीरपणे दुसरी मतपत्रिका उपलब्ध करून दिली,असा दावा पटनायक यांनी केला आहे. हा प्रकार लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून निवडणूक नियमांचे उघड उल्लंघन असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.

तर बीजेडी आमदार देवी त्रिपाठी यांनी “अयोग्य युती”च्या उमेदवाराला मतदान करण्यास नकार देत आपल्या विवेकाने वेगळी भूमिका घेण्यास भाग पाडल्याचे सांगितले. तसेच, सौविक बिस्वाल यांनीही “बिजू बाबूंचा आशीर्वाद” असलेल्या उमेदवाराला मतदान केल्याची कबुली देत पक्षाच्या अंतर्गत कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Operation Lotus News:ओडिशात ऑपरेशन लोटस? काँग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी ५ कोटींची ऑफर

दुसरीकडे, काँग्रेसमध्येही मोठी फूट दिसून आली आहे. प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी आपली मुलगी सोफिया फिरदौस आणि रमेश जेना यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सोफिया सुशिक्षित असूनही तिने पक्षादेशाबाहेर जाऊन मतदान केल्याचा संशय दास यांनी व्यक्त केला. “सोफियाचे भविष्य उज्ज्वल आहे असे वाटले होते, परंतु तिने दिलेले मत धक्कादायक आहे,” अशा शब्दांत दास यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

ओडिशात राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत असून, क्रॉस-व्होटिंगच्या आरोपांमुळे ही निवडणूक अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. भाजपने मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांना उमेदवारी दिली असून, अपक्ष उमेदवार दिलीप राय यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे. बीजेडीकडून संतृत मिश्रा रिंगणात आहेत, तर डॉ. दत्तेश्वर होता हे बीजेडी, काँग्रेस आणि सीपीआय(एम) चे संयुक्त उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

निवडणूक नियमानुसार, आमदारांना आपली मतपत्रिका पक्षाच्या अधिकृत एजंटला दाखवणे बंधनकारक आहे. भाजपसाठी उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंहदेव आणि कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन, बीजेडीसाठी प्रताप केशरी देव तर काँग्रेससाठी भक्त चरण दास एजंट म्हणून काम पाहत आहेत. प्रत्यक्ष मतदानावेळी झालेल्या राजकीय बंडाळीमुळे आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय उलथापालथीकडे लागले आहे.

 

 

 

Web Title: Political crisis in odisha rajya sabha polls 11 mlas from bjd and congress cross vote

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 07:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.