Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याच्या भावात मोठी घसरण; निर्यातबंदीचा आदेश पुढील सूचनेपर्यंत वाढवल्याने बसतोय फटका

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत परराष्ट्र व्यापार महासंचालकांनी (डीजीएफटी) गेल्या आठवड्यात कांद्याच्या निर्यातीसंदर्भात आदेश जारी केला होता. 31 मार्च 2024 पर्यंत लागू असलेला कांदा निर्यात बंदीचा आदेश पुढील सूचनेपर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2024 | 12:27 PM
कांद्याच्या भावात मोठी घसरण; निर्यातबंदीचा आदेश पुढील सूचनेपर्यंत वाढवल्याने बसतोय फटका
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत परराष्ट्र व्यापार महासंचालकांनी (डीजीएफटी) गेल्या आठवड्यात कांद्याच्या निर्यातीसंदर्भात आदेश जारी केला होता. 31 मार्च 2024 पर्यंत लागू असलेला कांदा निर्यात बंदीचा आदेश पुढील सूचनेपर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून देशभरातील महत्त्वाच्या बाजारात कांद्याचे भाव गडगडले आहेत.

गेल्या आठवड्यात नाशिकच्या लासलगाव मंडईत कांद्याचा सरासरी भाव 1440 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल होता. तो 1300 ते 1360 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला आहे. पुढच्या महिन्यापासून निर्यात सुरू झाल्यास भाव वाढतील, असे पूर्वी शेतकऱ्यांना वाटले होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आता बंदीची मुदत आणखी वाढवण्यात आल्याने बाजारातील भाव ढासळले आहे. त्यामुळे कांद्याचे घाऊक भाव कमी झाले आहेत.

सरकारी खरेदी सुरू 

दरम्यान, सरकारने कांदा खरेदी सुरू करण्याची घोषणा केली असून, या हंगामात सरकारी संस्था पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची बातमी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून आली आहे. केंद्र सरकारने नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया (एनसीसीएफ) यांना बफरच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक मंडईत कांद्याचे भाव फारसे पडू नयेत म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Web Title: Prices of onion is now continuously decreasing know reason behind this nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
1

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
2

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
3

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.