Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Nashik News: नाशिक शहरातील ३६ गणेश मंडळांवर शिक्षेची टांगती तलवार असून त्यांच्या भवितव्याबाबत आता न्यायालयीन निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे संबंधित गणेश मंडळांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आता कोर्टात काय होणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 29, 2026 | 11:23 AM
दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला (फोटो सौजन्य-ChatGPT)

दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • गणेश मंडळांची धाकधूक वाढली!
  • ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट
  • भवितव्य आता कोर्टाच्या हातात
Nashik News: मुख्य विसर्जन मिरवणुकीत नियमांना तिलांजली देत डीजेचा दणदणाट करणाऱ्या नाशिक शहरातील ३६ सार्वजनिक गणेश मंडळांचे भवितव्य आता थेट न्यायालयाच्या हातात असणार आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी या सर्व मंडळांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांना थेट जिल्हा व सत्र न्यायालय तसेच नाशिकरोड न्यायालयात खेचले जाईल. शुक्रवारी (दि. २५) मिरवणुकीदरम्यान ३६ मंडळांनी नियमांना तिलांजली देत प्रचंड आवाजात साऊंड सिस्टीम वाजवली होती. सरकारवाडा, पंचवटी व देवळाली कॅम्प पोलिसांच्या विशेष पथकांनी या ध्वनीप्रदूषणाची ‘डेसिबल’नुसार तंत्रशुद्ध व अचूक नोंद घेतली आहे.

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…

या मंडळांवर कारवाईचा बडगा

नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये रोकडोबा, शिवसेवा, युवक, युनायटेड, दंडे हनुमान, महालक्ष्मी चाळ, शिवस्य जनसेवा, हिंदू एकता, भोईराज आणि नेहरू चौक मित्र मंडळ या १० मंडळांवर प्रत्येकी २ खटले दाखल होणार आहेत. याशिवाय गुलालवाडी, रविवार कारंजा, भद्रकाली, सूर्यप्रकाश, गणेश मूकबधिर, श्रीमान सत्यवादी, वेलकम सहकार्य, नवक्रांती, शैनेश्वर, गजानन, वंदे मातरम्, तरुण मित्र, गवळी वाडा, गोल्डन बॉईज, एसएनजी, सहाव्या गल्लीचा राजा आणि युवक क्रांती मित्र मंडळ या १७ मंडळांवर प्रत्येकी १ खटला न्यायालयात चालणार आहे.

कोर्टात फेऱ्या मारण्याची वेळ

बजावलेल्या नोटिसांनुसार, संबंधित मंडळांचे अध्यक्ष, जबाबदार पदाधिकारी आणि डीजे ऑपरेटर यांना पोलिसांसमोर हजर राहून आपले लेखी व तोंडी म्हणणे मांडावे लागणार आहे. मात्र, पोलिसांनी ध्वनी तीव्रतेचे डिजिटल पुरावे आधीच गोळा केल्याने, पदाधिकाऱ्यानी काहीही स्पष्टीकरण दिले तरी त्यांना न्यायालयात थेट खटल्याला सामोरे जावेच लागणार आहे. या खटल्यामुळे आता पदाधिकाऱ्याऱ्यांना न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील, तसेच कायदेशीर शिक्षेची टांगती तलवार राहणार असल्याने मंडळ कार्यकत्यांचे धाबे दणाणले आहेत.

रविवारी (दि. २७) जुने नाशिक भागात काढण्यात आलेल्या ‘जुलूस-ए-गौसिया’ मिरवणुकीतही ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. गणेश मंडळांप्रमाणेच या मिरवणुकीच्या आयोजकांनाही न्यायालयात खेचले जाणार असल्याचे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांनुसार न्यायालयाकडून कठोर शिक्षेची तरतूद आहे. दोषी आढळल्यास संबंधित मंडळांचे पदाधिकारी आणि डीजे चालकांना ५ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ लाख रुपयांपर्यंत दंड, अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

वणीत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचा धडाका; अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Web Title: Nashik news ganesh mandals face legal trouble fate of 36 mandals now in court hands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
1

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन
2

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन

बुलेट ट्रेनसाठी भिवंडीत महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल तयार; ५४ हजारांहून अधिक बोल्टचा वापर
3

बुलेट ट्रेनसाठी भिवंडीत महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल तयार; ५४ हजारांहून अधिक बोल्टचा वापर

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
4

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.