आज २८ मे २०२३ हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. ज्या दिवसाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती त्या संसदेच्या (Parliament Building) नवीन इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यापूर्वी सरकारने संसदेची झलक दाखवणारा व्हिडिओ (Video) जारी केला होता. संसदेच्या या नव्या इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील शिल्प आणि कलाकृती साकारण्यात आल्या आहेत.
PM Modi unveils plaque; dedicates new Parliament building to nation
Read @ANI Story | https://t.co/RJS7OnK39r#PMModi #NewParliamentBuilding #NewParliament pic.twitter.com/cRs8VM1snJ
— ANI Digital (@ani_digital) May 28, 2023
दरम्यान, संसदेची नवीन इमारत मोठी असून, जुन्या इमारतीतील जागा अरुंद आहे. ती जागा अपुरी पडतेय. त्यामुळं नवीन भव्य दिव्य इमारत असावी, त्यात हजारो लोकं एकाच वेळी बसता यावी, असं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं होत. त्याचप्रमाणे संसदेची नवीन इमारत प्रशस्त व मोठी आहे. येथे एकाच वेळी हजारो लोकं बसू शकतात. तर अनेक सभागृह, ग्रंथालय, वाचनालय, सांस्कृतिक हॉल आदींचा भरणा येथे आहे.
[read_also content=”इंदूरचं अशोक चक्र, राजस्थानचं मार्बल,नागपूरवरून आलं सागवान… जाणून घ्या नवीन संसदेसाठी कोणत्या राज्यातून आलं कोणत्या गोष्टी https://www.navarashtra.com/india/ashok-chakra-from-indore-marble-from-rajastan-sagwan-wooden-from-nagpur-are-use-for-new-new-parliament-building-nrps-405092/”]
नवीन संसद भवन देशाची वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या चेंबर्समध्ये फॉल्स सिलिंगसाठी स्टील स्ट्रक्चर दमण-दीव येथून खरेदी करण्यात आले आहे. फर्निचर मुंबईत बनते. राजस्थानातील राजनगर आणि नोएडा येथून दगडी जाळीचे काम करण्यात आले. गेला. अशोक चिन्हासाठी साहित्य महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून मागवण्यात आले होते. फरशी त्रिपुरातील बांबूपासून बनवली आहे. तर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून कार्पेट बनवण्यात आले आहे.
दुसरीकडे, भिंतीवरील अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर येथून आणण्यात आले आहे. लाल किल्ला आणि हुमायूंच्या थडग्यातही हे खडेवापरण्यात आले. भगवा हिरवा दगड उदयपूर येथून, लाल ग्रॅनाइट अजमेरजवळील लाखा येथून आणि पांढरा संगमरवरी राजस्थानातील अंबाजी येथून आणला गेला आहे. येथे वापरले जाणारे सागवान लाकूड नागपुरातून आणले आहे. लाल-पांढरे वाळूचे खडे राजस्थानमधील सर्मथुरा येथून आणले आहेत.