उत्तरप्रदेश रन-वे वरून घसरले खाजगी विमान
विमान घसरले आणि थेट झाडीत घुसले
टेक ऑफ घेताच विमान घसरले
उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एका खाजगी विमानाला अपघात झाला आहे. हे विमान रन-वे वरून घसरल्याची घटना घडली आहे. हे विमान घसरल्यानंतर थेट झाडीमध्ये घुसले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची समोर आले आहे. खाजगी विमान जसे टेक ऑफ करण्यासाठी रन-वे वरून पुढे जात होते. त्याच वेळेस या विमानाचे चाक धावपट्टीवरून घसरले.
उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एका खाजगी विमानाला अपघात होता होता राहिला आहे. हे विमान रन-वे वरून घसरल्याने थेट झाडीत घुसले. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. विमानाच्या चाकांमध्ये हवा कमी असल्याचे हे विमान धावपट्टीवरून घसरल्याचे समजते आहे. ही घटना फर्रुखाबादच्या मोहम्मदाबाद हवाई तळावर घडली.
धावपट्टीवरून विमान घसरले आणि थेट झाडीत घुसले. हे खाजगी विमान उत्तर प्रदेशमधून भोपाळला उड्डाण करणार होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे. विमानाच्या चाकांमध्ये हवा कमी असल्याने हे विमान घसरले असल्याचे समजते आहे. या विमानातून एका खाजगी कंपनीचे काही अधिकारी भोपाळला जाणार होते.
विमान दुर्घटनेच्या तपासात सरकारचा दबाव?
जून महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या बोईंग विमानाला भीषण अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत २६० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेत केवळ एक प्रवासी बचावला आहे. विमानाने टेक ऑफ घेताच काही क्षणात ते एका रूग्णालयावर कोसळले होते. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यावर आता केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेवर बोलताना केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, “या दुर्घटनेची चौकशी नियमांनुसार निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने केली जात आहे. या घटनेच्या तपासात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा गडबड होत नाहीये. अंतिम अहवालाची धीराने वाट पहावी.”
एएआयबीच्या तपासावर प्रश्न उपस्थित झाल्यावर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी हे विधान केले आहे. “तपासात कोणताही हस्तक्षेप नाहीये. एएआयबी पूर्ण स्वातंत्र्याने तपास करत आहे. अहवाल घाईघाईने देण्यासाठी आम्हाला त्यांच्यावर दबाव टाकू इच्छित नाही. तपास गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे यासाठी थोडा वेळ लागेल. अंतिम अहवाल येण्यासाठी वेळ लागेल,” असे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले.