Bhagwant Mann
चंदीगड : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना कितीही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तरी ते झुकणार नाहीत, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. ‘अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भाजपच्या इशाऱ्यावर सीबीआयने केलेली अटक हा सीबीआयचा उघड गैरवापर आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.
कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर मान यांनी विधान केले. भगवंत मान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये केजरीवाल यांचा फोटोही शेअर केला आहे.
त्यात त्यांनी म्हटले की, ‘हे चित्र हुकूमशाहीविरुद्धच्या संघर्षाचे आहे. तुम्ही कितीही त्रास द्याल तरीही अरविंद केजरीवाल त्यापुढे झुकणार नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भाजपच्या इशाऱ्यावर सीबीआयने केलेली अटक हा सीबीआयचा उघड गैरवापर आहे’.
ये तस्वीर तानाशाही के ख़िलाफ़ संघर्ष की है अरविंद केजरीवाल झुकेगा नही जितना मर्ज़ी अत्याचार कर लो।
ED कोर्ट से जमानत के बाद CBI की गिरफ़्तारी BJP के इशारे पर CBI का खुला दुरपयोग है।
आप जिस तरह से आदाबे सियासत भूले
आप का नाम भी ज़ालिम में लिखा जाएगा। pic.twitter.com/o9fHVSj0mb— Bhagwant Mann (@BhagwantMann) June 27, 2024
केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्ली न्यायालयाने तपास यंत्रणेने दाखल केलेल्या अर्जावर युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीदरम्यान आप नेत्याने स्वतःला निर्दोष घोषित केले होते.