BJP Leader Viral Video: गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील भाजप नेते मनोहरलाल धाडक यांचा हायवेवरील आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेला अवघा एक महिना उलटला आहे. या व्हिडीओचे प्रकरण अद्याप ताजे असताना उत्तर प्रदेशातून एक धक्कादाक व्हिडीओ समोर आला आहे. युपीतील बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर परिसरातील भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा मंत्री राहुल वाल्मिकी एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना शिकारपूर कोतवाली हद्दीतील कैलावन गावातील स्मशानभूमीजवळ घडल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडिओमध्ये राहुल वाल्मिकी अंतर्वस्त्रांमध्ये गाडीतून बाहेर पडताना दिसत असून, गर्दी पाहताच ते लोकांचे पाय धरून माफी मागताना दिसत आहेत. ते व्हिडिओ न बनवण्याची विनंती करताना दिसत असून त्यांच्यासोबत असलेली महिला चेहरा स्कार्फने झाकण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना शुक्रवारी (११ जुलै) संध्याकाळी घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्मशानभूमीजवळ संशयास्पदरीत्या एक कार उभी असल्याचे पाहून काही स्थानिकांनी गाडीची झडती घेतली आणि ही धक्कादायक बाब समोर आली.
१२ किल्ल्यांचा ‘युनेस्को’ मध्ये समावेश, राज ठाकरेंनी दिला इशारा – ‘ही गोष्ट हलक्यात घेतल्यास…’
यावेळी अनेकांनी मोबाईलवर व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर शेअर केला. या प्रकारानंतर मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे.दरम्यान, राहुल वाल्मिकी यांच्या वडिलांनी हा व्हिडिओ सुमारे ५-६ महिन्यांपूर्वीचा असून, तो राजकीय द्वेषातून पेरलेला कट असल्याचा दावा केला आहे. बुलंदशहरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. तेजवीर सिंह यांनी सांगितले की, व्हिडिओची चौकशी सुरू आहे. अद्याप कोणतीही लेखी तक्रार दाखल झालेली नसली, तरी पोलिस व्हिडिओच्या आधारे सत्यता तपासण्याचे काम करत आहेत.
शुक्रवारी (११ जुलै) संध्याकाळी बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर तालुक्यातील केलावन गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला. गावातील स्मशानभूमीजवळ संशयास्पदरीत्या उभी असलेली एक कार पाहून स्थानिकांना संशय आला. गाडी बराच वेळ जागेवरून न हलल्यामुळे काही गावकरी तपासण्यासाठी जवळ गेले आणि त्यांनी पाहिलं की, कारमध्ये एक पुरुष आणि एक विवाहित महिला आक्षेपार्ह अवस्थेत होते.
बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई कधी होणार? खोटी प्रमाणपत्र सादर करुन घेतली सवलत
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, लोकांनी मोबाईल कॅमेरे सुरू करून व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. त्या दरम्यान गाडीचा दरवाजा उघडण्यात आला आणि गाडीतून एक तरुण बाहेर आला. तो भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हा मंत्री राहुल वाल्मिकी असल्याचे लगेचच उघड झाले. त्याच्यासोबत असलेली महिला देखील गाडीतून उतरली आणि तिचा चेहरा स्कार्फने झाकण्याचा प्रयत्न केला.
लोक व्हिडिओ बनवू लागल्याचे लक्षात येताच राहुल वाल्मिकी यांनी हात जोडून माफी मागण्यास सुरुवात केली. “माझा व्हिडिओ बनवू नका, मी माफी मागतो,” अशी विनंती त्यांनी उपस्थितांना केली. मात्र, जमलेले लोक त्याच्यावर संताप व्यक्त करत राहिले आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग थांबवलं नाही. या घटनेबाबत केलावन गावचे ग्रामप्रमुख उमेश यांनी सांगितले की, “गावकऱ्यांनी संशयास्पद गाडी पाहिल्यानंतर आवाज दिला. मी देखील तिथे पोहोचलो. गाडीत एक तरुण आणि महिला आक्षेपार्ह अवस्थेत होते. त्यानंतर झालेला प्रकार सर्वांनी पाहिलाच.”
हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही तासांतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यानंतर या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राहुल वाल्मिकी यांच्या वडिलांनी “हा व्हिडिओ ५-६ महिन्यांपूर्वीचा आहे आणि माझ्या मुलाविरोधात राजकीय कट रचला जात असल्याचा दावा केला आहे.