Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…

महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अनेक इच्छुकांनी पक्षांतर करत निवडणूक लढवली होती. तर काही जणांनी निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी फारकत घेत काम केले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2026 | 02:50 PM
मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी...

मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी...

Follow Us
Follow Us:

पुणे : महापालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ६९ कार्यकर्त्यांवर भाजपने सहा वर्षासाठी बंदी घातली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही कारवाई केली आहे.

महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अनेक इच्छुकांनी पक्षांतर करत निवडणूक लढवली होती. तर काही जणांनी निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी फारकत घेत काम केले होते. यामध्ये काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यापूर्वी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या एका माजी नगरसेवकावर पुन्हा एकदा कारवाई केली गेली आहे. २०१७ साली या माजी नगरसेवकाला उमेदवारी नाकारली होती. तेव्हा त्याने बंडखोरी केल्याने पक्षाने कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा या माजी नगरसेवकाला भाजपमध्ये प्रवेश दिला गेला होता.

यावेळी पुन्हा उमेदवारी नाकारल्यानंतर या माजी नगरसेवकाने बंडखोरी केली होती. त्याच्यावर पुन्हा एकदा कारवाई केली गेली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करणारे अमोल बालवडकर हे एकमेव नगरसेवक निवडून आले आहे. त्यांच्यावरही भाजपने सहा वर्षांची बंदी घातली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही अधिकृत घोषणा केली असून, या सर्वांवर थेट सहा वर्षांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

शिस्तभंग करणाऱ्यांवर कारवाई

निवडणुकीच्या काळात पुण्यातून भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे साकडे घातलं होतं. मात्र, जागावाटपाचे गणित आणि बाहेरून पक्षात आलेल्या नेत्यांमुळे अनेक निष्ठावंतांना उमेदवारी मिळू शकली नाही. या नाराजीतून काही कार्यकर्त्यांनी थेट बंडाचे निशाण फडकवत निवडणूक लढवली, तर काहींनी पडद्यामागून विरोधी उमेदवारांना मदत करणे पसंत केले. अशा शिस्तभंग करणाऱ्यांवर आता पक्षाने वेचून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांचाही समावेश

यामध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मागील पंचवार्षिक निवडून आलेल्या आणि यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारलेल्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यातील बहुतेकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ औपचारिकता असल्याचे बोलले जात आहे.

हडपसरमध्ये सर्वाधिक बंडखोर

धीरज घाटे यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, सर्वाधिक बंडखोर हे हडपसर विधानसभेतील आहेत. यामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातील १९ जण निलंबित केले आहेत तर, खडकवासलामधील ९ जण, पुणे कॅन्टोन्मेंटमधील ९ जण, वडगावशेरीमधील ८ जण, शिवाजीनगरमधील ७ जण, कोथरूड मधील ६ जण, कसबा पेठ मधील ६ जण आणि पर्वतीमधील ४ जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली…? अजित पवारांच्या अपघातावर बच्चू कडूंनाही संशय

Web Title: Bjp takes action against 69 workers who took a stand against the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • Pune Politics

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
2

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
4

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.