'मी चूक केली, ओबीसींना कधी समजून घेतलं नाही...', जातनिहाय जनगणेवरून राहुल गांधी असं का म्हणाले?
दलित, आदिवासी आणि महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांना वेळ लागला, मात्र ओबीसीची परिस्थिती उशिरा समजली. मी मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, वन हक्क कायदा यासारख्या मुद्द्यांवर चांगलं काम केले, पण ओबीसींच्या बाबतीत मी अपयशी ठरलो, अशी कबुली कॉंग्रसचे नेते आणि लोकसभचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे. यापुढे ओबीसीसाठीच्या लढ्याला प्राधान्यक्रम असेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित ओबीसी भागिदारी महासंमेलनात ते बोलत होते.
विरोधकांचा SIR ला तिव्र विरोध, तरीही संसदेत चर्चा नाहीच; सरकारने दिलं स्पष्टीकरण
ओबीसी महासंमेलनाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.
संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आता ओबीसीसाठीचा लढा प्राधान्यक्रम असेल. तेलंगणातील जातीय जनगणने देशात राजकीय वादळ येणार असून आरएसएसला ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हिंमत असेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाका; चिराग पासवान यांचं राहुल गांधी-तेजस्वी यादव यांना आव्हान
ओबीसी समाजाच्या समस्या वेळेत समजून घेता आल्या नाहीत. ही सर्वात मोठी राजकीय चूक होती. ‘जर कॉंग्रेसची सत्ता असताना ओबीसींच्या व्यथा समजल्या असत्या तर मी त्याचवेळी जातीय जनगणना केली असती. दलित, आदिवासी आणि महिलांचे प्रश्न समजून घेण्यात वेळ लागला. मी मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, वन हक्क कायदा यासारख्या मुद्द्यांवर चांगले काम केले, पण ओबीसींच्या बाबतीत मी अपयशी ठरलो. पण उशीरा का होईना ओबीसींची परिस्थिती समजली आहेस, अशी कुबली त्यांनी दिली आहे.
आता मागे हटणार नाही आणि जातीय जनगणनेपासून ते आरक्षणाची मार्यादा वाढेपर्यंत ओबीसींच्या हक्कांसाठीचा लढ्याला निर्णायक यश मिळवून देणार आहे. पीजीव्ही (प्रियंका गांधी वाड्रा) यांना विचारा, जर राहुल गांधी काही ठरवतात तर ते मागे हटतात का?’ राहुल गांधींनी काँग्रेसशासित तेलंगणा सरकारच्या जातीय जनगणनेला ‘वादळ’ असं संबोधित केलं असून आकडे धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. तेलंगणाच्या कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये किती ओबीसी, दलित, आदिवासी आहेत, हे एका मिनिटात समोर येणार, असल्याचं त्यांनी सांगितलं.