हिंमत असेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाका; चिराग पासवान यांचं राहुल गांधी-तेजस्वी यादव यांना आव्हान
लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहार निवडणुकीवरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर मी त्यांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आव्हान देतो. पण ते कधीही तसं करणार नाहीत. त्यांच्यात तेवढी ताकद नाही, असा टोला लगावला आहे. चिराग यांनी यावेळी निवडणुकीत एका सामान्य जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचे आणि पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचेही स्पष्ट केले.
‘आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही’; बिहार मतदार यादी फेरपडताळणीवरून राहुल गांधींचा इशारा
प्रशांत किशोर यांच्याबद्दल चिराग काय म्हणाले?
चिरग पासवान यांनी निवडणूक रणनीतीकार बनलेले नेते प्रशांत किशोर यांना त्यांचे चांगले मित्र असल्याचं म्हटलं आहे. प्रशांत किशोर यांची जातविरहित समाज आणि नवीन राजकारणाची विचारसरणी माझ्याशी जुळते. मी जात आणि धर्मापेक्षा वरच्या लोकांकडे पाहतो.चिराग यांनी बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलही चिंता व्यक्त केली. मी नेहमीच बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात गुन्हेगारांचे नाही तर कायद्याचे राज्य असले पाहिजे, असं त्यांनी मत व्यक्त केलं.
चिराग पासवान म्हणाले की मी आधीच सांगितले होते की आमचा पक्ष बिहारमधील २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढवेल आणि आज मी पुन्हा तेच सांगत आहे. मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे, लवकरच बिहारला परत जायचे आहे, यावर अंतिम निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. निवडणूक लढवणे माझ्यासाठी फायदेशीर ठरेल का यावर पक्ष चर्चा करेल. पक्षाकडे मी सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
विधानसभा निवडणुकीत ते नितीश कुमार यांचा प्रचार करतील का? या प्रश्नाच्या उत्तरात चिराग म्हणाले की नितीश कुमार आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ही राज्य सरकारची बाब आहे. याकडे लक्ष दिलं पाहिजे. नितीश यांच्या प्रकृतीबाबत चिराग म्हणाले की मी त्यांना सतत भेटत राहतो आणि मला वाटते की ते राज्याचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. विरोधी पक्ष खोट्या बातम्या पसरवत असल्याचं ते म्हणाले.
तर निवडणुकीवर बहिष्कार घालणार, तेजस्वी यादव यांचं मोठं विधान
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत विरोधी पक्षातील गोंधळ तीव्र झाला आहे. मतदार यादीत अनियमितता होण्याची शक्यता असल्याने राजद नेते तेजस्वी यादव यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसने आज त्यावर मऊ पण धोरणात्मक भूमिका घेतली आहे. एआयसीसी मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू म्हणाले की इंडिया ब्लॉकचे सर्व मित्रपक्ष या मुद्द्यावर (निवडणूक बहिष्कार) विचार करतील आणि निर्णय घेतील. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत.दरम्यान, तेजस्वी यादव यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे विधान केवळ निवडणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी केले होते आणि त्याचा अशा प्रकारे अर्थ लावला जाऊ नये, असं कॉंग्रेसने म्हटलं आहे.