विरोधकांचा तिव्र विरोध तरीही, SIR वर चर्चा संसदेत चर्चा नाहीच, सरकारने दिलं स्पष्टीकरण
बिहार निवडणुकीपूर्वी मतदार यादी विशेष फेरपडताळणीच्या (SIR) मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तसेच बिहार विधानसभेच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पावसाळी अधिवेशनात मतदार यादीतील सुधारणांवर चर्चा करण्याची मागणी होत आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आतापर्यंत एकही दिवस व्यवस्थित चाललेलं नाही. संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र निवडणूक आयोगाशी संबंधित बाबींवर संसदेत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे.
Election Commission Order On SIR: बिहारनंतर आता सर्व राज्यांत SIR;निवडणूक आयोगाचा निर्णय
केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की बिहारमध्ये सुरू असलेल्या निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष फेडपडताळणी (SIR) प्रक्रियेवर संसदेत चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे विरोधक काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होताच, विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला आहे. काँग्रेस, राजद आणि तृणमूल काँग्रेस सारखे पक्ष त्याला विरोध करत आहेत.
बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष, राजद आणि काँग्रेसकडून मतदार यादी विशेष फेरपडताळणी (SIR) प्रक्रियेला तीव्र विरोध केला जात आहे. याशिवाय एआयएमआयएम आणि टीएमसीनेही याला विरोध केला आहे. विरोधी पक्षांनी संसदेत एक प्रस्तावही मांडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार या विषयावर कोणतीही चर्चा करू इच्छित नाही. केंद्र सरकारचा असा युक्तिवाद आहे की हा निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही ही प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे, त्यावर सभागृहात चर्चा होणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.
हिंमत असेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाका; चिराग पासवान यांचं राहुल गांधी-तेजस्वी यादव यांना आव्हान
दरम्यान शुक्रवारी राहुल गांधी यांनी एसआयआरशी संबंधित पोस्टर फाडलं आणि ते कचऱ्याच्या डब्यात फेकले. सरकार आपलं अपयश लपवत आहे. म्हणूनच ते संसदेत चर्चा करण्यास तयार नाहीत, असा आरोप प्रियंका गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांनी केला आहे.